धुळदेव (ता. फलटण) : दि.२०.१२.२०१७ रोजी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानदीप शिक्षण व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मांडवे संचलित माॅडर्न इंग्लिश मेडियम स्कुल, ज्ञानदीप. I.T.I काॅलेज व श्रीराम स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक काॅलेज धुळदेव (ता. फलटण जि. सातारा) शाखेच्या विद्यार्थ्यांच्यावतीने बुधवारी स्वच्छता फेरी काढून ठिकठिकाणी स्वच्छता केली. विद्यार्थ्यांनी संस्थेपासून सुरुवात करत ग्रामपंचायत कार्यालय, धुळदेव देवस्थान ते संपुर्ण गाव व परिसरात स्वच्छता करून स्वच्छता मोहिम यशस्वी केली. दरम्यान संस्थेच्या आवारात संत गाडगे महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. एम. डी. ढोबळे सर होते. प्रमुख पाहुण्यांना वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे प्राचार्य सी.डी.ढोबळे सर यांनी केले.
यावेळी बोलताना प्रा. एम. डी. ढोबळे सर म्हणाले की, स्वच्छता अभियानात प्रशासनापेक्षा लोकसहभाग महत्त्वाचा आहे़ या अभियानात सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपले घर, गल्ली आणि परिसर स्वच्छ ठेवला तर ही मोहीम यशस्वी होईल.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन मुधोजी हायस्कुलचे प्राचार्य ए.के. रुपनवर सर, काकडे सर, धुळदेव गावचे सरपंच चंद्रकांत जाधव,
उपसरपंच जालिंदर तात्या भिवरकर, माजी सरपंच सुभाषभाऊ शिंदे, मा.उपसरपंच पोतदार साहेब, योगेश फुले, चेअरमन हरिभाऊ माने, अंकुश खिलारे सर तसेच संस्थेचे सर्व शिक्षक, कर्चचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वच्छता मोहिमेचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले तसेच स्थानिक प्रशासनाने दखल घेऊन संस्थेचे आभार मानले व कार्यक्रमास शुभेच्छा देण्यात आल्या.