सातारा –: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस चौकी व्हावी यासाठी 2005 पासून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पोलीस चौकीचे काम पूर्ण झाले आहे. परंतु त्याचे लोकार्पण झालेले नाही. ते लोकार्पण व्हावे यासाठी पाठपुरावा केल्यानंतर लवकरच होईल असे सांगितले होते परंतु ते झालेले नाही. या पोलीस चौकीचे लोकार्पण लवकरात लवकर करावे अन्यथा 14 ऑगस्टपर्यंत न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
निवेदनात, जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण, धरणे आंदोलन, मोर्चे येत असतात. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचा-यांना ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण व्हावे यासाठी 2005 पासून माहिती अधिकारात वारंवार उपोषण, जनआंदोलन केले. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस चौकीचे काम पूर्णत्वास नेले आहे. हे काम पूर्णत्वास जाऊन बरेच दिवस झाले तरी अद्यापही पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना या चौकीचा लाभ घेता आला नाही. या पोलीस चौकीचे लोकार्पण 15 दिवसात न झाल्यास 24 जुलै रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, त्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज वर्ग केला असून त्यांच्या स्तरावर प्रश्न सोडवून घ्यावा असे कळवण्यात आले, त्यामुळे 24 जुलैचे धरणे आंदोलन केले नाही. परंतु पोलीस अधीक्षकांनी या प्रश्नावर न्याय न दिल्यास, पोलीस चौकीचे लोकार्पण न झाल्यास दि. 14 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस चौकीचे त्वरित लोकार्पण करावे ; 14 ऑगस्टपर्यंत न झाल्यास बेमुदत उपोषण –: सुशांत मोरे
RELATED ARTICLES