Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीजावली पं.समितीत महिला कर्मचार्‍यांसाठी तक्रार निवारण समिती

जावली पं.समितीत महिला कर्मचार्‍यांसाठी तक्रार निवारण समिती

 केळघर: आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रभावीपणे काम करत आपले अस्तित्व सिध्द करत आहेत. परंतु धकाधकीच्या जीवनात काही वेळा त्याना ञास सहन करावा लागतो. तो सहन न करता त्यास प्रतिबंध करत निर्भिडपणे तक्रार निवारण समितीकडे तक्रार देऊन आपले प्रश्न सोडविण्यासाठी महिलांनी एकजुटीने एकञ यावे असे आवाहन तहसिलदार रोहिणी आखाडे (फडतरे) यांनी केले .
मेढा (जावली) येथील पंचायत समितीत कार्यालयांच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळ निवारण समिती अधिनियम 2013 अंतर्गंत, तालुकास्तरीय महिला तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली. त्या फलकांच्या अनावरण प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी सभापती अरुणा शिर्के, गट विकास अधिकारी सतीश बुध्दे, समिती अध्यक्षा पुष्पलता गायकवाड, सचिव साफिया मुल्ला, अ‍ॅड अमृता गाढवे, पर्यवेक्षिका श्‍वेता अनगळ, संगीता वेदे, व्ही.व्ही. भिलारे, एम़ टी. कोळी, जरे मॅडम, तिटकारे मॅडम आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी सभापती अरुणा शिर्के म्हणाल्या, महिलांनी कोणत्याही ठिकाणी काम करताना अन्याय सहन न करता आपली तक्रार देऊन अन्याय करणार्‍यांना अद्दल घडविण्यासाठी पुढे यावे. गटविकास अधिकारी सतीश बुध्दे म्हणाले, तक्रार निवारण समितीने महिला कर्मचार्‍यांमधील आत्मविश्वास वाढवून प्रभावीपणे कामकाज करावे, असे आवाहन केले.
यावेळी समितीच्या अध्यक्षा पुष्पलता गायकवाड, सचिव साफिया मुल्ला, अ‍ॅड अमृता गाढवे यांनी विविध कार्यालयात काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांच्या अडीअडचणी, समस्या मांडून त्याविषयीचा कायदा व त्याचा कसा वापर करावा . यावर मार्गदर्शन केले, कार्यकमाचे सूत्रसंचालन कक्ष अधिकारी रघुनाथ बाबर यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular