Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीसहापदरीकरणाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी

सहापदरीकरणाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी

सातारा : राष्ट्रीय महामार्ग 4 चे सहापदरीकरणाचे रखडलेले काम तातडीन पूर्ण करा. ज्या ठिकाणी अडचणी येत आहेत त्या स्थळांची पाहणी करुन तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज केल्या.

राष्ट्रीय महामार्ग क्र.4 चे सहापदरीकरणाच्या कामात येणार्‍या अडीअडचणीबाबत आज जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग क्र.4 चे प्रकल्प संचालक, संबंधित काम करणारी यंत्रणा व स्थानिक रहिवाशी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग क्र.4 चे सहापदरीकरणाचे रखडलेले काम द्रुतगतीने पूर्ण करावेत.चालू भूसंपादन प्रस्तावामध्ये 98 टक्के जमिनी संपादित करुन संपादन मंडळास ताबा देवूनही महामार्गाचे काम मंदगतीने होत आहे. संपादन मंडळ म्हणून आजअखरे काय कार्यवाही केली याबाबतचा शासनास तसेच कार्यालयास अहवाल सादर करावा.
महामार्गाच्या कामामुळे मौजे खिंडवाडी येथील सेवा रस्ता व रखडलेले कामकाज, भुईंज येथील स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता, पावसाचे पाणी स्मशानभुमी व गावामध्ये येत असल्याने होणारे नुकसान, मौजे शिरवळ येथील रखडलेले सेवा रस्त्याचे काम, विद्युतवाहिनी स्थलांतरीत करणे, मौजे वेळे येथील नवीन व्हीयुपी तसेच मौजे खेड ता. सातारा येथील व्हीयुपीची  उंची वाढविणे  यात अभिप्रेत आहे. तसेच मौजे सुरुर, वेळे येथील जमिन संपादीत न करता व संबंधित खातेदारांना नुकसान भरपाई अदा केली नाही इत्यादीबाबत संबंधित गावचे सरपंच, ग्रामपंचाय सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती, सदस्य व स्थानिक रहिवाशी, बाधीत खातेदार यांचे म्हणणे विचारात घेवून स्थानिकांची होणारी गैरसोय व नुकसान दूर करण्यासाठी कोणतेही कामे करतांना स्थानिक रहिवाशी यांचे म्हणजे विचारात घेवून कायदेशीर मागौने काम करण्याच्या सूचनाही देवून बाधित खातेदारांना तातडीने नुकसार भरपाई अदा करावे, असे आदेशही जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी यावेळी दिले.
सातारा-पंढरपूर मार्ग विस्तारिकरण
सातारा-पंढरपूर या मार्गाच्या विस्तारिकरण एकूण 97 कि.मी एवढे सातारा जिल्ह्यातून जाणारे अंतर असून त्यातील जवळ जवळ 70 कि.मी. च्या कामाचे नियोजन झाले असून पुढील रस्त्यांच्या मोजनीचे आदेश जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज दिले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular