महाबळेश्वर : आज संपूर्ण देशावर आलेल्या आणीबाणीच्या लढ्यामध्ये डॉक्टरांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या कार्याला सलाम केला जात असताना महाबळेश्वर मधील डॉक्टर देखील तेवढ्याच तत्परतेने कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात सामील झाले आहेत.
भारतामध्ये सर्वात जास्त कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्र मध्ये असल्याने महाराष्ट्र सरकारने COVID-19 लढ्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे.सर्व सरकारी यंत्रणानी आपली कंबर कसली आहे.त्यातच सातारा जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता जिल्यातील बहुतांश सरकारी विश्रामगृहांचे कोरोना केअर सेंटर मध्ये रूपांतर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून महाबळेश्वर मधील सर्व सुखसोईंनी युक्त महाराष्ट्र विकास महामंडळाचे रिसॉर्ट (एम.टी.डी.सी ) हे देखील कोरोना बाधितांसाठी विलगिकरण कक्षात रूपांतर करण्याचा जिल्हाप्रशासनाने महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.
त्याअनुषंगाने आज दि.२९ रोजी महाबळेश्वर तालुका कोविड- 19 पथकाचे प्रमुख अधिकारी डॉ. श्री. मोहिते व महाबळेश्वर मधील सर्व स्थानिक डॉक्टरांच्या पथकाने संबंधित विलगिकरन कक्षाची पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला. त्याच बरोबर कोविड -19 विरुद्धच्या लढ्यामध्ये करावयाच्या उपाय योजना संदर्भात सर्व डॉक्टरांनी विचार मंथन केले.
याप्रसंगी महाबळेश्वर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.श्री. नंदकिशोर भांगडीया, डॉ.श्री . सुहास जंगम, डॉ .श्री. मानकर, डॉ .श्री . किरण बावळेेकर, डॉ. श्री.अभिषेक दबडे, डॉ.श्री. प्रभाळे, डॉ. श्री.नजीम डोंगरे, आदि मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.
महाबळेश्वर मध्ये कोरोना केअर सेंटरची डॉक्टर पथकाकडून पाहणी
RELATED ARTICLES