मेढा :- मेढा हे तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असून परिसरातुन ये- जा करणाऱ्या नागरीकांची सुरक्षा व्हावी या करीता मेढा नगरपंचायतीने जंतुनाशक फवारणी केंद्र ( सॅनिटायजर टनेल ) उभारावे असे सामाजिक कार्यकर्ते संजय शेटे यांनी सुचित केले आहे .
मेढा नगरपंचायत करत असलेली कामे कोरोना लढ्याकरीता निश्चितच वाखाणण्याजोगी असून मेढा बाजारपेठेत सतत वर्दळ चालू राहत असल्याने नगरपंचायतीने मेढा येथे सॅनिटायजर केंद्र उभारले गेले तर याचा फायदा नागरीकांना, तसेच बाजारपेठेत कामानिमित्त ये- जा करणारे खरेदीदार यांना होणार असून यामुळे विषाणुजन्य कोरोनाचा प्रादुर्भावास आळा बसणार असल्याचे सूचित करून या केंद्राची योग्य वेळ ठरवून याचा लाभ नागरीकांच्या आरोग्य सेवेकरीता मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मेढा हे तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असून नागरीकांना जंतुनाशक फवारणी केंद्र अर्थात सॅनिटायजर केंद्राची निर्मिती नगरपंचायती मार्फत होणे आवश्यक आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न मिटणार असून मेढा येथे कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. :- संजय शेटे सामाजिक कार्यकर्ते मेढा
याबाबत मुख्याधिकारी सो अमोल पवार यांचेशी चर्चा झाली असून योग्य ती माहिती घेवून मेढा येथे सॅनिटायजर केंद्राबाबत निर्मिती करण्यात काही अडचण आहे का याची माहिती घेणे सुरू असून लवकरच निर्णय घेण्यात येईल
—: अनिल शिंदे (नगराध्यक्ष मेढा )