Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीमेढा बाजारपेठेत कोरोनाला "रोको ना" ऐवजी "बढाओ ना" ची भिती टांगणीला

मेढा बाजारपेठेत कोरोनाला “रोको ना” ऐवजी “बढाओ ना” ची भिती टांगणीला

मेढा ( वार्ताहर) मेढा बाजारपेठेत अजुनही बाहेर गावावरून माल घेण्याकरीता येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या नागरिकांनी सोशल डिस्टींगला कोलदांडा दिल्याने “कोरोनाला रोको ना ऐवजी बढाओ ना ” ची भिती मेढा शहरात निर्माण झाली आहे.

मेढा तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असून परिसरातील नागरीक माल खरेदी करणे कामी या बाजारपेठेची निवड करत असून नियमाप्रमाणे सकाळी ८ते ११ या वेळेत बाजार पेठ सुरळीतपणे चालू राहत आहे . मेढा येथे सरकारी बॅका, पतसंस्था मोठया प्रमाणावर असून पैसे भरणे- काढणे या बँकींग कामाकरीता ही ग्राहक गर्दी करत आहेत. या वर्दळीच्या वेळी पोलिस प्रशासन ही करडी नजर रोखून बाजार पेठेवर लक्ष देत असून नागरीकांना योग्य पद्धतीने आणि एकमेकात अंतर ठेवून माल खरेदी करण्याच्या सक्त सुचना देत असून काही नागरीक मात्र सोशल डिस्टींग चे पालन न करता खरेदी करताना पहावयास मिळत आहे.जावली तालुक्यातील निझरे गावात मुंबईहून आलेला चाकरमानी कोरोना पॉझिटिव सापडल्याने गावकरी भितीच्या छायेखाली राहत असून जावली विभागात अजुन रुग्ण होवू नयेत याकरीता प्रशासन विभाग आपले सर्व प्रयत्न करीत आहे.
मेढा गावच्या आजुबाजुला असणारी गावे यांना भाजीपाला मिळावा या करीता गावोगावी मालवाहतुक करणाऱ्या गाडया जात आहेत. तसेच प्रत्येक गावात किराणा मालाचे दुकान असूनही बाहेर गावातून येणारी ग्राहकांची संख्या वाढत असल्याने नागरीकांनी नक्की काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular