फलटण प्रतिनिधी – तरडगाव ता,. फलटणमध्ये पहिला कोरोना संसर्गजन्य बाधित रुग्ण आढळला असल्यामुळे फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी आता अधिक सतर्क व काळजीपूर्वक वागण्याची गरज निर्माण झालीअसल्याचे मत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.
संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्रातही संचारबंदी कायदा लागू केला आहे, मात्र त्याची तंतोतंत अंमलबजावणी नागरिकांच्या कडून होताना दिसत नाही. अशी खंत व्यक्त करून ना.रामराजे पुढे म्हणाले की यापूर्वी मी फलटण तालुक्यासह शहरातील जनतेला वारंवार प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तरी देखील फलटण शहरातील गल्ली बोळात व तालुक्यातील काही भागांमध्ये विनाकारण लोक/युवक एकत्र येऊन गप्पा गोष्टी मारताना व फिरताना दिसत आहेत या मुळे तुम्ही पोलिसांना फसवत नसून स्वतः ला फसवत आहात, तथापि तुमच्यासह तुमच्या कुटुंबातील इतरांचे आरोग्य धोक्यात आणत आहात.
आता मात्र आपल्या तालुक्यामध्ये कोरोना संसर्ग झालेली एक महिला पॉझिटिव्ह आढळून आलेली आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वीसारखे आपणाला गाफील राहून चालणार नाही,कारण या आजाराचा संसर्ग खूप झपाट्याने व गुणाकार पद्धतीने होत असतो,असे सांगून ना.रामराजे म्हणाले की
मी फलटण तालुक्यातील व शहरातील प्रशासनाशी संपर्क साधून आहे तसेच प्रशासनाला खालील सूचनांचे तंतोतंत पालन करणे संबंधित आदेश देण्यात आलेले आहेत.
या मध्ये संपूर्ण तालुक्यात व शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात यावी,शहराकडे व तालुक्याच्या हद्दी कडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात यावेत असे आदेश दिले आहेत,आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून प्रत्येक घरा घरात जाऊन स्क्रिनिंग करण्यात यावे,ज्या नागरिकांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळतील त्यांच्यावर विशेष लक्ष वैद्यकीय पथकांमार्फत दिले जावे व अशी काही लक्षणे आढळल्यास स्वतः हुन आरोग्य विभागाशी संपर्क साधा घाबरून जाऊ नये,सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन घेण्यात यावे,सर्व जीवनाश्यक वस्तू लोकांनी दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षाही त्यांना घरपोच पुरविण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ठोस कारणा शिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही असे ना.रामराजे यांनी स्पष्ट केले आहे.
तरी मी पुन्हा फलटण तालुक्यासह शहरातील सर्व जनतेला व माझ्या युवक मित्रांना कळकळीची विनंती करतो की, आपण वरील सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे व आपली तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी तसेच मीच माझा व माझ्या कुटुंबाचा शहराचा,गावचा रक्षक या नात्याने काम करावे अशी अपेक्षा ना.श्रीमंत रामराजे यांनी शेवटी व्यक्त केली आहे.
तरडगावमध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी अधिक सतर्क व काळजीपूर्वक वागावे :- विधान परिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर
RELATED ARTICLES