Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीकृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील दोन अनुमानितांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह  ;  एका...

कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील दोन अनुमानितांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह  ;  एका अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह तर 68 जणं विलगीकरण कक्षात दाखल

सातारा दि.21 (जि.माका) : 38 पुरुष व 25 वर्षीय युवकाला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे कोरोना बाधिताच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून हे दोघेही कोरोना बाधित (कोविड-19) असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.   या दोन कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत.

तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 1 अनुमानित निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 19, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 13, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 14, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 13, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 9 असे एकूण 68 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.   या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular