Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीपाच जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ; नऊ अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

पाच जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ; नऊ अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

सातारा दि. 15 ( जि. मा. का ): क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 5 कोरोना अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 9 नागरिकांना कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 4 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 3, कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे 2 नागरिकांना तीव्र जंतु संसर्गामुळे अशा एकूण 9 जणांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.
0000

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular