Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीसातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झाली 79 ; कराड येथील दोन नागरिक...

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झाली 79 ; कराड येथील दोन नागरिक बाधित तर 171 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा दि. 4 ( जि. मा. का ): वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या 2 नागरिकांचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात 68 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 79 बाधित रुग्ण आढळले आहेत.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 5, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 152, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 9 असे एकूण 171 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
0000

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular