Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीजिल्ह्यात एकूण 95 कोरोना पॉझिटिव्ह ; सातारा शहरातील एक तर...

जिल्ह्यात एकूण 95 कोरोना पॉझिटिव्ह ; सातारा शहरातील एक तर कराड तेथील 2 असे एकूण तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ; सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील 70 वर्षीय महिला बाधित

 

सातारा दि. 7 ( जि. मा. का ): वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणारी  2 वर्षीय मुलगी व 68 वर्षीय पुरुष तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील 70 वर्षीय महिला अशा एकूण 3 निकट सहवासितांचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

23 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 1, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 व उपजिल्हा रुग्णालय,फलटण येथील 10 असे एकूण 23 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

130 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

 6 मे रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे 7, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 102, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 21 असे एकूण 130 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 79, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 14, कोरोना बाधित मृत्यु- 2 तसेच जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 95 इतकी आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular