सातारा दि. 8 ( जि. मा. का ): कराड येथील 6 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त होऊन बाहेर पडले. या सहा रुग्णांना 23 एप्रिल पासून कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे कोरोना ( कोविड 19 ) बाधित म्हणून उपचार सुरु होते. त्याची 14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे सहा कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या सहा जणांना आज घरी सोडण्यात आले.
या सहा जणांना कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
आत्तापर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथून 12 असे जिल्ह्यातील एकूण 20 रुग्ण कारोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
00000
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणारे 6 बाधित रुग्ण कोरोना मुक्त आज सोडले घरी
RELATED ARTICLES