Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडी2 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह तर पुण्यात कॅन्सरचा उपचार घेत असलेली 50 वर्षीय...

2 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह तर पुण्यात कॅन्सरचा उपचार घेत असलेली 50 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित ; महाबळेश्वर कोरोना मुक्तच असून सदर व्यक्ती मुंबईतून थेट साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल झाली ; त्याचा महाबळेश्वरशी संबध आलेला नाही

 

सातारा  : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मुंबई वरुन प्रवास करुन आलेला 23 वर्षीय युवक व पुणे येथून प्रवास करुन आलेला 8 मे ला विलगीकरण कक्षात दाखल केलेला  36 वर्षीय पुरुष असे एकूण 2 जण कोविड-19 बाधित असल्याचे  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.

या बाधित रुग्णापैकी एक रुग्ण हा महाबळेश्वर येथील आहे परंतु त्याचा महाबळेश्वरशी संबंध आलेला नाही . तो गेली अनेक महिने महाबळेश्वर बाहेरच होता.त्याला मुंबई त लागण झाली आहे तेथून तो सातारा येथे आला आणि त्याला सिव्हिल मध्ये भरती करण्यात आले .महाबळेश्वर आजही कोरो ना मुक्त आहे ….

तसेच सातारा येथील 50 वर्षीय कॅन्सरपिडीत रुग्ण उपचारासाठी पुणे येथे गेला असता तो कोविड बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने आय. सी. एम. आर. पोर्टलमध्ये सातारा जिल्ह्याच्या यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 3 नवीन कोविड-19 बाधित रुग्णांची नोंद झाली असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

वरील अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 119 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 97, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 20, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण  आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular