पाटण :- कोयना विभागातील शिरळ ता. पाटण या गावात सहा दिवसापुर्वी अहमदाबाद वरून आलेल्या कुटुंबातील ७० वर्षाच्या वयोवृद्ध माणसाला कोरोनाची लागण झाली आहे. अहमदाबाद वरुन येताना कुटुंबातील आठ जण सोबत होते. प्रशासन यंत्रणा अलर्ट झाली असून शिरळ गाव पुर्णतः शिल केले आहे. तर निकटवर्तीय आठजणानां कोरोंनटाईंन करण्यात आले आहे. दरम्यान बनपुरी येथील ४३ वर्षीय म्रुत्यु झालेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पाटण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. तर काल सायंकाळी पुणे येथून भारसाखळे येथे खाजगी रुग्ण वाहिका मधून डेड बौडी आणली जात आसताना पाटणच्या अलर्ट प्रशासने ती रुग्ण वाहिका गावाबाहेर आढवून यातील मयत ३५ वर्षीय इसमाचा म्रुत्यु नेमका कोणत्या कारणाने झाला हे तपासण्यासाठी हि रुग्ण वाहिका क्रुष्णा हौस्पीटल कराड येथे पाठविण्यात आली आहे.
पाटण तालुक्यात कोयना विभागातील शिरळ येथे पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने कोयना विभागासह पाटण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाधित झालेल्या रुग्णाला कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सहा दिवसापूर्वी अहमदाबाद येथून कुटुंबियांसोबत शिरळ येथे घर वापसी झालेल्या या ७० वर्षीय इसमाला खोकला, ताप व श्वसन त्रास झाल्याने मंगळवारी दि. १९ रोजी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेवुन हा रुग्ण पाटण येथील बर्गे हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल झाला या रुग्णाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे बर्गे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने या रुग्णाला पाटण ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. पाटण ग्रामीण रूग्णालयातून या रुग्णाला कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या रुग्णाला मधुमेह देखील आहे.
अहमदाबाद वरून आपल्या कुटुंबातील ८ लोकांबरोबर हा वयोवृद्ध रुग्ण आपल्या घरी शिरळ येथे आला आहे. या रुग्णा सोबत आलेल्या कुटुंबियांना पाटण येथील विलगीकरण कक्षात दाखल केले असून सर्वांचे श्राव तपासणीस पाठविण्यात आले आहेत. दरम्यान बनपुरी येथील ४३ वर्षीय म्रुत्यु झालेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना देखील पाटण येथील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. तर सोमवारी रात्री मुंबई येथून भारसाखळे ता. पाटण येथील एक कुटुंब घरवापसी येत आसताना पुणे दरम्यान येथील ३५ वर्षीय एका इसमाचा ह्दयविकाराच्या धक्क्याने म्रुत्यु झाला. काल सायंकाळी पुणे येथून भारसाखळे येथे खाजगी रुग्ण वाहिका मधून या मयत इसमाला आणले जात आसताना पाटणच्या अलर्ट प्रशासने ती रुग्ण वाहिका गावाबाहेर आढवून मयतासोबत आलेल्या नातेवाईकांसह पाटण येथे आणली. यातील नातेवाईकांना विलगीकरण कक्षात ठेवून हि रुग्ण वाहिका मयत इसमाच्या कोरोना टेस्ट साठी कराड येथील क्रुष्णा हौस्पीटल येथे पाठविण्यात आली आहे.