पाटण :- शुक्रवारी रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातील ४० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आसताना शनिवारी दिवसभरात आणखी ६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या एकुण जिल्ह्यातील ४६ रुग्णांपैकी ऐकठ्या पाटण तालुक्यातील २२ कोरोना बाधित रुग्णांचा समावेश झाला आहे. या अहवालाने पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून कोरोना भुकंप झाल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. तर पाटण तालुक्यातील एकुण रुग्णांची संख्या २८ झाली आहे.
यामध्ये पाटण तालुक्यात बनपुरी, धामणी, बाचोली, गलमेवाडी ढेबेवाडी विभाग एकूण -१६, शिरळ – ४, गावडेवाडी – २ असा रुग्णांचा समावेश आहे. यातील १५ रुग्ण पाटण येथील कोरोना विलगीकरण कक्षात दाखल होते. तर २ रुग्ण गावडेवाडी प्राथमिक शाळेत कोरोंनटाईंन झाले होते. यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच त्यांना शनिवारी सकाळी १२ वा. सुमारास तातडीने पुढील उपचारासाठी क्रुष्णा हौस्पीटल कराड येथे नेण्यात आले आहे. तर गावडेवाडी येथील निकटसहवाशीत ९, आणि वाटोळे येथील १ अशा १० जणांना पाटण येथे कोरोणटांईन केले आहे अशी माहिती प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.आर. पाटील, डॉ. चंद्रकांत यादव यांनी दिली. तर बनपुरी, शिरळ, गावडेवाडी, भालेकरवाडी, गलमेवाडी, धामणी, बाचोली या गावात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाटण येथील विलगीकरण कक्षात ६७ कोरोना बाधित निकट सहवाशीत कोरोणटांईन करून ठेवण्यात आले होते. त्यापैकी पंधरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून अद्याप ५२ जणांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. आज नव्याने गावडेवाडी येथील ९ जण आणि वाटोळे येथील १ जण पाटण येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. या कोरोना केयर सेंटर मधे निकट सहवाशीत व्यक्तींची संख्या वाढत असून सैनिक वस्तीग्रुह, बाळासाहेब देसाई कौलेज वस्तीग्रुह येथे वाढीव प्रयायी व्यवस्था करण्यात आली आहे.

