Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीमुंबईवरून प्रवास करून आलेल्या एक कोरोना बाधित आणि एक अनुमानिताचा मृत्यू

मुंबईवरून प्रवास करून आलेल्या एक कोरोना बाधित आणि एक अनुमानिताचा मृत्यू

सातारा दि. 25 (जिमाका): क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे आज वाई तालुक्यातील आसले येथील 70 वर्षीय मधुमेह असलेल्या कालच कोरोनाबाधित म्हणून आढळून आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाई तालुक्यातील जांभळेवाडी येथील 52 वर्षीय मधुमेह असलेल्या पुरुषाचा मृत्यू झाला असून कोरोना अनुमानित म्हणून त्याचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
मृत्यू झालेले दोघेही मुंबईवरुन प्रवास करुन आलेले होते. त्यांना मधुमेह व श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
184 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 12, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 64, वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुगणालय कराड येथील 55, उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 48 व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 5 अशा एकूण 184 अनुमानित नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular