Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीपरळी खोऱ्यात कोरोनाचा शिरकाव ; मुंबईहून प्रवास करून आलेला रायघर येथील...

परळी खोऱ्यात कोरोनाचा शिरकाव ; मुंबईहून प्रवास करून आलेला रायघर येथील युवक कोरोना बाधित


परळी :- गेल्या 2 महिन्याहुन अधिक काळ संपूर्ण भारत लॉकडाऊन असून महाराष्ट्रात कोरोनाची मगर मिठी अधिकच घट्ट होत आहे. साताऱ्यात ही कोरोनाचा धुमाकूळ हा सुरूच होता परंतु सातारा तालुक्यातील परळी खोरे या पासून अलिप्त होते परंतु मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट नुसार मुंबई येथून प्रवास करून आलेली व्यक्ती कोरोना बाधित असल्याने रायघरसह परळी खोरे हादरले आहे.
सदर व्यक्ती हा मुंबई (वाशी) येथून रविवारी रायघर येथे आली. सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी आरोग्य सेवक पाहणीसाठी गेल्यावर काही लक्षणे आढळली त्या नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र ठोसेघर येथे दाखल करण्यात आले. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी पाटील यांनी सादर व्यक्तीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट मध्ये सदर व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने परळी खोऱ्यत थरकाप उडत होता.
सदर व्यक्ती बरोबर मस्करवाडी गावातील एकत्रित प्रवास केला होता त्यांना तसेच कुटुंबातील सात जण याना ही विलगीकरण कक्षत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular