Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीज्येष्ठ नागरीकांनी लसीकरण शिबीराचा लाभ घ्यावा :- श्री. सतिश बुध्दे

ज्येष्ठ नागरीकांनी लसीकरण शिबीराचा लाभ घ्यावा :- श्री. सतिश बुध्दे

मेढा ( वार्ताहर ) मेढा परिसरातील नागरीकांनी लसीकरण शिबीर चा लाभ घेवून कोरोना प्रतिबंधास सहकार्य करावे असे आवाहन गटविकास अधिकारी सतिश बुध्दे यांनी केले आहे.
मेढा येथिल गणेश मंदिर येथे आयोजीत लसीकरण शिबीरात ते बोलत होते, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की , कोरोना संक्रमणाची ची लाट अजुन ओसरली नाही त्यामुळे ज्येष्ठ नागरीकांची काळजी घेणे महत्वाचे बनले आहे. या लसीकरणामुळे रोग प्रतिकार करण्याची क्षमता प्राप्त होणार असून ज्येष्ठांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे असे सुचित केले . यावेळी मेढा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत यादव, डॉ. नितीन गुंड, व्यायाम मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, नगरसेविका पुष्पा तांबोळी, शिवसेनेचे सचिन करंजेकर, प्रविण पवार, अमित लकेरी, सामाजिक कार्यकर्ते अशोक शेटे, संजय शेटे, दिपक गोरे, आशिष दिक्षीत आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी या शिबिरास मेढा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत यादव,आरोग्य केंद्र केळघर येथिल डॉ. नितीन गुंड, आरोग्य सहाय्यक विशाल रेळेकर, सतिश मर्देकर, आरोग्य सेवक अमित सिंह परदेशी, संदिप शेवते, आशा स्वयंसेविका सिमा दिक्षीत, प्रतिभा देशमुख, सुजाता बाबर, ज्योती धनावडे, कमल जुनघरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबीराकरिता शिवसेनेचे सचिन करंजेकर, प्रविण पवार, सामाजिक कार्यकर्ते संजय शेटे यांनी गटविकास अधिकारी सतिश बुध्दे यांचेकडे सतत पाठपुरावा केल्याने हे शिबीर केळघर आरोग्य केंद्र अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्याने आयोजीत केले गेले असून मेढा आणि पंचक्रोशीतील नागरीकांनी सहकार्य केल्यास लसीकरण शिबीराचे आयोजन करता येईल असेही सुचित केले आहे. या शिबिराचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला असल्याने ज्येष्ठ नागरीकांचे चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular