Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीकोयना येथे कोविड सेंटर उभारणार ; श्रमिक मुक्ती दलाच्या मागणीला यश

कोयना येथे कोविड सेंटर उभारणार ; श्रमिक मुक्ती दलाच्या मागणीला यश

पाटण – संपूर्ण महाराष्ट्राला विज देऊन प्रकाशमय करणाऱ्या कोयना विभागातील प्रकल्पग्रस्तांना कोरोनाच्या संसर्गाने ग्रासले असताना आतापर्यंत ११ जणांना उपचाराअभावी प्राणास मुकावे लागले आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, चैतन्य दळवी, महेश शेलार, सचिन कदम, बळीराम कदम, सीताराम पवार श्रीपती माने यांनी राज्याचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील- याड्रावकार यांच्याकडे संपर्क साधून कोयनानगर येथे तातडीने कोविड सेंटर चालू करण्याबाबत मागणी केली असता राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून कोयना येथे कोविड सेंटर उभारणी जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी मिना साळुंखे यांनी कोयना येथे कोविड सेंटरच्या जागेची पाहणी केली.

कोयना परिसरात कोविड च्या दुसऱ्या लाटेचा अक्षरशः मोठया प्रमाणात कहर झाला आहे. उपचारासाठी पाटण, कराड, सातारा याठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नाही, कारण कोयना परिसर हा डोंगराळ व दुर्गम भाग आहे. त्यामुळे उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे कोयना परिसरातील मृत्यूचे प्रमाण हे वाढत आहे. रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी तात्काळ उपाययोजना होणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास उपचारा अभावी मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा धोका होऊ शकतो. कोविडच्या दुसऱ्या लाटेत आजपर्यंत ११ जनांना प्राण गमवावे लागले आहेत.
ज्या कोयनेच्या धरणग्रस्तांच्या त्यागामुळे देशात नंदनवन झाले त्याच लोकांना कोरोना सारख्या महामारी मध्ये उपचारा अभावी आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे आपण आरोग्य मंत्री म्हणून विशेष लक्ष देऊन कोयनानगर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा कोयना प्रकल्पाच्या रुग्णालयात २० ऑक्सीजन बेड आणि १० ICU बेड ची व्यवस्था निर्माण करणे अत्यंत तातडीचे बनले आहे. याबाबत आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल व लोकांचे होणारे उपचारा अभावी होणारे मृत्यू रोखाल अशा आशयाची मागणी राज्याचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील- याड्रावकार यांच्याकडे संपर्क साधून कोयनानगर येथे तातडीने कोविड सेंटर चालू करण्याबाबत मागणी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, चैतन्य दळवी, महेश शेलार, सचिन कदम, बळीराम कदम, सीताराम पवार, श्रीपती माने यांनी केली होती. या अनुषंगाने पाटणचे तहसिलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी मिना साळुंखे यांनी कोविड सेंटरच्या जागेची पाहणी केली. यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, यांची उपस्थिती होती.

-मा श्री राजेंद्र पाटील याड्रावकार यांनी या पत्राची दखल घेत मा डॉ भारत पाटणकर यांच्या संपर्क साधून कोयनानगर येथे कोविड सेंटर चालू करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असल्याचे सांगितले.व आज दि.11मे रोजी तात्काळ पाटण तहसीलदार यांनी भेट देऊन दवाखान्याची पाहणी करून लवकरात लवकर सुरू करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. कोयना धरणग्रस्त व अभयारण्य ग्रस्तांच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री श्री राजेंद्र पाटील याड्रावकर यांचे आभार मानले

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular