Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीम्हासुर्णे येथे कोविड आयसोलेशन सेंटर सुरू ; म्हासुर्णे गावातील ग्रामस्थांना दिलासादायक बातमी

म्हासुर्णे येथे कोविड आयसोलेशन सेंटर सुरू ; म्हासुर्णे गावातील ग्रामस्थांना दिलासादायक बातमी

म्हासुर्णे प्रतिनिधी :- आज सकाळी अकरा वाजता म्हासुर्णे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हासुर्णे येथे कोवीड आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात असुन सध्या पंचवीस बेडचे सुविधा या ठिकाणी उपलब्ध असुन औषधे उपचार सुरू आहे तसेच डॉक्टर व नर्स ,आशासेविका,अगणवाडी सेविका यांची दररोज व्हिझीट आहे तरी गावातील ग्रामस्थांना विनंती ज्यांना घरी राहण्यासाठी सोय नाही त्यांनी कोरोना आयसोलेशन सेंटर मध्ये राहण्यासाठी हरकत नाही.गावातील काही दानशुर व्यक्ती गावासाठी व गावातील जनतेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे मदत करत आहात त्या दानशुर व्यक्तीचे गावाच्या वतीने धन्यवाद काही दिवसात या व्यक्तीचे नावे जाहिर करु खरच आज भरपूर प्रमाणात आपण गावासाठी काही तरी करु या भावनेने मदत करायला पुढे आला पुन्हा एकदा धन्यवाद तसेच म्हासुर्णे गावातील सर्व युवकांनी ज्या ठिकाणी कोवीड सेंटर सुरू करण्याची जागा होती तेथील साफ सफाई करुन आपल्या गावासाठी सहकार्याची भुमिका ठेवुन पुर्ण परिसर म्हासुर्णे येथील युवकांनी साफ केला. आजच्या उद्घाटन प्रसंगी म्हासुर्णे गावचे उपसरपंच विठ्ठल माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,मा.उपसरपंच व युवा नेते अजित माने (शेठ),ग्रामपंचायत सदस्य सिकंदर मुल्ला,गुलाब वायदंडे,सुहास माने,संगिता गुरव,प्राथमिक आरोग्य केंद्र काळे सिस्टर,आशासेविका सरकाळे,भरत माने,रामचंद्र सरकाळे,तुषार कुलकर्णी ,मनिषा माने,उपस्थित होते.*

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular