सातारा ः क्रेडाई अर्थातच कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) या बांधकाम क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या सातारा शाखेने अल्पावधीतच आपल्या कार्यामुळे देशभर ठसा उमटवला आहे. क्रेडाई सातारा शाखेची ही घोडदौड बघता देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी सातारा शाखेला मिळेल यात शंका नाही असे उद्गार क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी काढले.
के्रडाई सातारा शाखेच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी शांतिलाल कटारिया बोलत होते. यावेळी के्रडाई सातारा शाखेच्या अध्यक्षपदी जयंत (बाळासाहेब) ठक्कर यांनी तर सेक्रेटरीपदी विवेक निकम, उपाध्यक्षपदी सुधीर शिंदे, जाईंट सेक्रेटरीपदी मजिद कच्छी व खजिनदारपदी सागर साळुंखे यांनी सन 2019 ते 2021 या कालावधीसाठी पदाची सूत्रे माजी अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर व सेक्रेटरी सुधीर शिंदे यांच्या हस्ते स्वीकारली. क्रेडाई सातारा वुमनविंग च्या सिटी कोऑर्डिनेटरपदाची सूत्रे सौ. ज्योती ठक्कर यांनी के्रडाई नॅशनला वुमन विंगच्या अध्यक्षा श्रीमती दर्शना परमार -जैन यांच्या हस्ते स्वीकारली. यावेळी नम्रता देशमुख, क्रेडाई कराड, फलटण, बारामतीचे पदाधिकारी, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष सयाजी चव्हाण, बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी, क्रेडाई व बीएआयचे सदस्य, मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शांतिलाल कटारिया म्हणाले की, क्रेडाई हे सर्व ज्ञानाचे विद्यापीठ आहे. आज क्रेडाईला शासनापासून ते सामान्य ग्राहकापर्यंत वेगळा दर्जा आहे. यावेळी त्यांनी साताराचे मावळते अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून सातारा शाखेने देशात वेगळा ठसा उमटवल्याचे सांगितले. यावेळी क्रेडाई नॅशनल वुमन विंगच्या अध्यक्षा दर्शना परमार-जैन यांनी वुमन विंगचे वेगळेपण व आवश्यकता का आहे याची माहिती उपस्थितांना दिली.
क्रेडाई साताराचे मावळते अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर यांनी सातारा शाखेच्या स्थापनेपासून केलेल्या कामांचा आलेख उपस्थितांना सांगितला. यावेळी नूतन अध्यक्ष बाळासाहेब ठक्कर यांनी दोन वर्षात करणार्या कामांचा संकल्प उपस्थितांना दिला. यामध्ये टेक्निकल सेमीनार, लेबर रजिस्ट्रेशन, विविध विषयांवरील कार्यशाळा, सी.एस.आर. प्रोजेक्ट याबद्दलचा मानस व्यक्त केला. यावेळी श्रीमता नम्रता देशमुख यांनी विविध विषयांवरील उद्बोधक व्याख्यान सादर केले.
सर्व प्रमुख पाहुणे, निमंत्रीत व पदाधिकारी यांचा सातारा क्रेडाई तर्फे बुके, सन्मानचिन्ह देऊन श्रीधर कंग्राळकर , सुधीर शिंदे यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अमेय आगटे व आभघरप्रदर्शन सुधीर शिंदे यांनी केले.
क्रेडाई सातारामध्ये देशाचे नेतृत्व करण्याचे गुण ः शांतिलाल कटारिया
RELATED ARTICLES

