Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकोरेगावात गावठी कट्टा जप्त; दोघांना अटक

कोरेगावात गावठी कट्टा जप्त; दोघांना अटक

कोरेगाव: शहरातील रहिमतपूर रस्त्यावर दोन व्यक्ती गावठी कट्टा विक्रीस घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवनाथ हिंदुराव लोहार, रा. कुमठे व संदीप धनाजी पाटसुते, रा. मरळी, ता. पाटण यांना अटक करुन, त्यांच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर गवसणे, सहाय्यक ङ्गौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, हवालदार विनोद गायकवाड, पोलीस नाईक मोहन नाचण, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन व गणेश कचरे यांच्या पथकाने रविवारी रात्री कोरेगाव-रहिमतपूर रस्त्यावर सापळा रचला होता.
त्यावेळी मोटारसायकल क्र. एम. एच. 11-सी. एम. -5605 वरुन नवनाथ हिंदुराव लोहार, रा. कुमठे व संदीप धनाजी पाटसुते, रा. मरळी, ता. पाटण हे गावठी कट्टा घेऊन विक्रीस आले होते, या पथकाने त्यांना अटक करुन कट्टा जप्त केला. याप्रकरणी केतन शिंदे यांनी ङ्गिर्याद दिली असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular