महाबळेश्वर : एकत्रित कुटूंबाची पांचगणी येथील मिळकत खोट्या कागदपत्रांच्या आधारे एस. एम. बाथा एज्युकेशन ट्स्ट पांचगणी यांना 52 कोटी रूपयांनी परस्पर विकुन फसवणुक केल्या प्रकरणी दोराब बक्तियार पांडे (वय 60, रा. दादर पुर्व मुंबई) यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात तक्रार केली आहे. या सात जणां पैकी 3 जण हे युनाटेड किंग्डम येथील असून या सात जणांविरोधात फसवुणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोराब बक्तियार पांडे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, पांचगणी येथील नगरयोजना क्र 3 मधील प्लॉट नंबर 464 ही संपूर्ण मिळकत जाल पेस्टनजी यांच्या मालकी वहीवाटीची होती त्यांचे मृत्युनंतर या मिळकतीवर त्यांचे वारस असलेले दोन मुले फिरोज विरजी व पेसी विरजी व तीन मुली गुल जॉर्ज ब्लकनर्ब, खोरशिद होमी भरूचा व शिरीन जमशेद लिलाउवाला यांची नावे मिळकतीच्या दस्तावर नोंद करण्यात आली मुळ मालक यांचे चिरंजीव फिरोज यांचे 1990 रोजी निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी आपले मृत्युपत्र लिहुन ठेवले होते. या मृत्यु नुसार फिरोज यांच्या हिश्याची मालकिन त्यांची पत्नी डॉली फिरोज विरजी या झाल्या फिरोज यांनी आपल्या मृत्यु पत्रातच मिळकतीचा विश्वस्त व एक्झिक्युटर म्हणुन माझी नेमणुक केली होती. फिरोज यांच्या मृत्यु पत्रानुसार फिरोज यांच्या पत्नीचे नाव व विश्वस्त म्हणून दोराब बक्तियार पांडे यांच्या नावाची नोंद मिळकतीच्या कार्ड करण्यात आली होती. या नोंदी करताना भुमि अभिलेख कार्यालयाने चौकशी करून अहवाल तयार केला होता या अहवालावर पंच म्हणुन गिता चौक्सी यांनी पंच व साक्षीदार म्हणुन सही केली आहे. दरम्यानच्या काळात मार्च 2000 मध्ये या मिळकतीचे सर्व अधिकृत वारस कौंटुबिक समजोता करून करार केला. या कराराची नोंद नोटरी करून त्यावर सर्व अधिकृत मिळकत धारकांनी आपल्या सह्या केल्या आहेत. या करारामध्ये इतर सर्व वारसांनी फिरोज यांच्या पत्नी डॉली यांना या मिळकती मधील अविभक्त हिश्यांचा मालक म्हणून अधिकृत नोंद करून मान्यता दिली होती.
डॉली फिरोज विरजी ही माझी मावशी लागते माझे मावशीने 2008 मध्ये आपले मृत्युपत्र लिहुन ठेवले होते हे मृत्युपत्र सहा दुययम निबंधक मुंबई येथील कार्यालयात नोंदविण्यात आले आहे. मावशीने केलेल्या मृत्युपत्रास आज अखेर कोणीही आव्हान दिले नाही किंवा इतर वारसांनी ते नाकारलेही नाही. मावशीने केलेल्या मृत्युपत्रानुसार या मिळकती मधील तिचा हिस्सा माझे नावे केला होता त्यानुसार तिच्या हिश्याचा मी एकमेव मालक व वारसदार होतो व आहे. माझी मावशी डॉली विरजी हिचे 2012 मध्ये निधन झाले त्यानुसार या मिळकतीच्या इतर वारसदार गीता रूसी चोक्सी रा. नाना चौक मुंबई, सायरन होमी भरूचा रा. कल्याणी नगर पुणे, डॅफने पेसी विरजी रा बेंगलोर, झाल पेसी विरजी, जीमी पेसी विरजी व रॉय पेसी विरजी हे तिघेही रा युनायटेड किंग्डम व मोहीणी सुदर्शनम रा. बेंगलोर यांना या मिळकती मधील माझे हिश्या पुर्ण माहिती होती व त्याबाबत योग्य वेळी सविस्तर चर्चा करण्याचे मान्य केले होेते तसेच मिळकतीच्या कार्डावर इतर हिस्सेदारांबरोबर माझे नावाची नोंद करण्याचे मान्य करून तशी हमी त्यांनी मला दिली होती. परंतु 2014 पर्यंत दिलेल्या आश्वासना नुसार मिळकत कार्डावर माझी नोंद केली नाही. उलट 2014 साली मोहीणी सुदर्शनम यांनी उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय महाबळेश्वर यांचेकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून व वारसदारांबाबतची खरी माहीती लपवुन ही मिळकत वरील सात जणांनी आपल्या नावे नोंद करून घेतली अशा प्रकारे या सात जणांनी माझा हिस्सा गिळंकृत करून माझे आर्थिक नुकसान केले. या मिळकतीमध्ये माझा हिस्सा असतानाही मला कोणतीही कल्पना न देता माझा हिस्सा परस्पर हडप करून ही मिळकत 52 कोटी रूपयांना विकण्यात आली म्हणुन माझी या सात जणांविरोधात तक्रार आहे.
दोराब पांडे यांनी दिलेल्या तक्रारी वरून महाबळेश्वर पोलिसांनी वरील सात जणां विरोधात फसवणुक प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे या सात जणां विरोधात भादवी 406, 420, 465, 468, 471, 34 नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आशोक काशिद व श्रीकांत कांबळे हे करीत आहेत.