म्हासुर्णे : (तुषार माने प्रतिनिधी) पुसेसावळी परिसरातील चोराडे,म्हासुर्णे गावामध्ये बंद दुकाने, व बंद घरे फोडून चोरट्यांचा धूमाकूळ सुरू झालेमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल रात्री चोराडेतील सत्यवान पिसाळ यांच्या घराचे कुलुप तोडून रोख रक्कम, मोबाईल, ब्लासलेट चोरी झाली,तसेच दाजी पिसाळ यांच्या घरातून मोबाईल एक हजार रुपयेची चोरी झाली,तसेच म्हासुर्णेतील भरत माने यांचे स्टेशनरीचे दुकानातून कोड्रीक्स पिऊन, हजार दिड हजाराची रोकड गेली तसेच मज्जीद तांबोळी यांची हॉटेलचे कुलुप तोडले पण तिथे काही सापडले नाही, तसेच विजय सुर्यवंशी यांचे स्टेशनरी दुकानाचा फक्त कुलुप तोडले परंतु तिथेही काही मिळाले नाही तसेच अर्जुन माने यांच्या शिवानी जनरल स्टोअर्स मधुन दोन ते तीन हजाराचा रोख रक्कम चोरीला गेली म्हासुर्णे स्टॅडजवळ बिल्डींगचे काम चालु आहे , तेथील कामगारांचा मोबाईल चोरीला गेला आहे,तरी या घटनेची पोलीस दूर क्षेत्रात नोंद झालेली नाही,त्यामुळे या परिसरात पोलीसांची रात्रग्रस्त सुरू करावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांच्याकडून होत आहे.
म्हासुर्णे चोराडे परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ
RELATED ARTICLES