Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीबाळू रोकडे यांचा मृत्यू ; पत्नीने पतीला जाळले प्रकरण

बाळू रोकडे यांचा मृत्यू ; पत्नीने पतीला जाळले प्रकरण

पाटण :(प्रतिनिधी) कोयना विभागातील रिसवड या गावात पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीनेच त्यांना पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यातील जखमी बाळू संपत रोकडे यांचा नुकताच उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत कोयनानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 20 डिसेंबर रोजी रिसवड येथे बाळू रोकडे यांचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्या पत्नी सौ. सिता बाळू रोकडे यांनी झोपेत असणाऱ्या पतीला पेटवून देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात बाळू रोकडे हे गंभीर भाजले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सिव्हिल रूग्णालय सातारा येथे दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी सिता रोकडे हिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तीला अटक केली होती. या दरम्यान न्यायालयाने तीला पहिल्यांदा पोलिस कोठडी सुनावली सध्या तीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कोयनानगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular