Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीखैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारा टैम्पो- ट्रक गजाआड ; पाटण वनरक्षकांची कारवाई

खैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारा टैम्पो- ट्रक गजाआड ; पाटण वनरक्षकांची कारवाई

पाटण दि.- तारळे ता. पाटण येथून खिर्डी ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथे खैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारा टैम्पो- ट्रक पाटण – रामापुर येथे आला असता पाटण वनरक्षकांनी त्याचा पाठलाग करून टैम्पो-ट्रक ( एम.एच. ५०- १७०२ ) सह तिघांना ताब्यात घेतले. यात टैम्पो-ट्रक सह खैर लाकडाचा मुद्दे मालासह सात लाख अकरा हजाराचा मुद्दे माल जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी. शनिवारी सकाळी ११.४५ वा. सुमारास तारळे ता. पाटण येथून खैर लाकडाची वाहतूक करणारा टैम्पो-ट्रक खिर्डी ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथे जात होता. याची खबर पाटण वनरक्षकांना मिळताच पाटण येथील कराड- चिपळूण रोडवर या टैम्पो- ट्रक बाबत वनरक्षक पाळत ठेवून होते. संशयित टैम्पो- ट्रक पाटण-रामापूर येथील हणुमान मंदिराजवळ येताच त्याला अडविण्यात आले. या टैम्पो-ट्रक मधे वनरक्षकांना खैराचे लाकूड आढळून आले असता ड्रायव्हर संजय उत्तम कोरडे वय-३०, याच्यासह संजय काशीराम जाधव वय-४६, जनार्दन अर्जुन वाघे वय-७० सर्व राहणार चिपळूण जि. रत्नागिरी यांना ताब्यात घेतले. या कारवाईत अकरा हजाराच्या खैराच्या लाकडासह सात लाखांचा टैम्पो- ट्रक असा एकूण सात लाख अकरा हजार रुपयेचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास वनक्षेत्रपाल विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक जयवंत कवर, रविंद्र कदम, अरविंद जाधव, हणमंत कुंभार हे करत आहेत.

फोटो- मुद्दे मालासह वनरक्षक व आरोपी.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular