Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीकरपेवाडी येथील भाग्यश्रीच्या खुन प्रकरणी बापच पोलिसांच्या ताब्यात : परिसरात एकच खळबळ

करपेवाडी येथील भाग्यश्रीच्या खुन प्रकरणी बापच पोलिसांच्या ताब्यात : परिसरात एकच खळबळ

पाटण:- करपेवाडी ता. पाटण येथील भाग्यश्री संतोष माने वय- १७ या महाविद्यालयीन युवतीच्या खुनाचे गुड नाट्यमय वळणावर आले असून पोलिसांना उकलण्यात यश येत आहे. भाग्यश्रीचा खुन दुसऱ्या-तिसऱ्या कोणी केला नसून तिच्या बापानेच संतोष माने याने केला असल्याचा दाट संशय पोलिसांना आला असुन अधिक चौकशीसाठी संतोष माने यास शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले आहे. बापाच्या आटकेणे परिसरात एकच खळबळ उडाली असून या खुनात आणखी कोणा-कोणाचा हात आहे. याची कसून चौकशी ढेबेवाडी पोलिस करत आहेत.

याप्रकरणी परिसरातील दोन मांत्रिकाकडे कसून चौकशी सुरू असून भाग्यश्री चा खुन अंधश्रद्धेतून झाला का? आणखी कोणत्या कारणाने याचा पोलिस शोध घेत आहेत.

करपेवाडी ते तळमावले या गावच्या हद्दीतील देसाई शेत या शिवारालगतच्या उसाच्या शेतामध्ये अज्ञाताने गळा चिरुन भाग्यश्री माने हिचा निर्घृण खून केल्याची घटना गेल्या महिन्यात मंगळवार, २२ जानेवारीला उघडकीस आली होती. संबंधित युवती तळमावले (ता. पाटण) येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात बारावीच्या वर्गामध्ये शिकत होती. नेहमीप्रमाणे ती कॉलेजला गेली होती. मात्र कॉलेज सुटून ती घरी परत न आल्यामुळे घरातील लोकांनी शोधाशोध सुरु केला. ती ज्या ज्या रस्त्याने जाते, त्या त्या रस्त्याने शोध घेतला असता दुपारी तीनच्या सुमारास करपेवाडी व गावच्या हद्दीतील उसाच्या शेतामध्ये ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसल्याचे  भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले होते.

भाग्यश्री माने यांच्या खून प्रकरणातील संशयितांना गजाआड न केल्याने १ फेब्रुवारी रोजी सातारा जिल्ह्यात नाभिक समाज बांधवांनी बंद पाळत निषेध मोर्चे काढले होते. तर अनेक ठिकाणी आरोपींना अटक होण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थींनी यांचे मोर्चे संघटनांचे निवेदन पोलिसांनां देण्यात आले होते.  त्याचबरोबर संशयित गजाआड न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता. मात्र आता या प्रकरणात नाट्यमय वळण लागले असून भाग्यश्रीच्या खुनात कोणा कोणाचा सहभाग आहे ? याचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाटण पोलिस उपविभागीय अधिकारी अगंद जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे पुढील तपास करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular