Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीशेनवडी येथे बेवारस स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत सापडले

शेनवडी येथे बेवारस स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत सापडले

खटाव : ( तुषार माने ,म्हासुर्णे प्रतिनिधी )खटाव तालुक्यातील शेनवडी येथील (रसाळमळा )येथे उरमोडीच्या कॅनॉलमध्ये एक दिवसाचे  स्त्री जातीचे अर्भक (बाळ ) पाण्यावरती तरंगत लाडेगाव- वांझोळी -रहाटणी -चोराडे कडून येणाऱ्या दिशेने
शेनवडी हददीत मृतावस्थेत सापडले,
अधिक माहिती अशी म्हासुर्णे गावाला पिण्याचे पाणी उरमोडी कॅनॉलचे शेनवडीहद्दीतील रसाळमळा येथून सुरू आहे.
पाणी पाहण्यासाठी म्हासुर्णे गावचे सरपंच सचिन माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने व त्यांचे सहकारी गेले होते त्यावेळी त्यांना उरमोडी कँनाॕलच्या पाण्यावर ते स्त्री जातीचे (बाळ)तरंगताना दिसले. पाहिल्यानंतर पुसेसावळी पोलीस स्टेशनला संपर्क साधून यांची माहिती दिली.
या घटनेची नोंद  पुसेसावळी पोलीस स्टेशनला झाली असून हवालदार फिरोज मुल्ला  तपास करित आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular