सातारा : आठ महिन्यापुर्वी 13 जुलै 2017 रोजी कराड तालुक्यातील गायकवाडी येथील किशोर रामचंद्र गायकवाड(वय, 29) या युवकाचे स्कार्पिओ गाडीसह आठ महिन्यापुर्वी हिंदी चित्रपटातील कथेप्रमाणे अपहरण केले. त्याची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून झाली होती. अखेर किशोरचा खुन झाल्याचे निष्पन्न होवून सांगली जिल्ह्यातील स्वयंघोषीत मुख्य सुत्रधार सर्जेराव यशवंत राजवंस-सावंत उर्फ महाराज व त्याचे साथीदार सागर देसाई, राहुल शिंदे यांना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 72 तास चौकशी केल्यानंतर स्वयंमघोषीत महाराज व त्यांच्या साथीदारांनी किशोर गायकवाडच्या खुनाची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली. दरम्यान सांगलीच्या स्वयघोषीत महाराजाला अटक होत असली तरी सातार्यातील महाराजांबाबत न्याय प्रविष्ठ बाब असल्याचे त्यांनी पत्रकार परीषदेत दिले.
याबाबत माहिती अशी की, कराड तालुक्यातील गायकवाडवाडी येथील किशारे रामचंद्र गायकवाड याने रेडीयशन पावर (आरपी) व्यवसायासाठी 11 लाख रूपये आरोपी मुख्य सुत्रधार मुख्य सुत्रधार सर्जेराव यशवंत राजवंस-सावंत उर्फ महाराज, त्याचा मेव्हणा सागर देसाई, साथीदार राहुल शिंदे( तिघेही रा. नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्याकडे दिले होते. सदर रेडीयशन पावरचा फायदा न झाल्यामुळे किशोर गायकवाड याने 11 लाख रूपये परत देण्यासाठी तगादा लावला होता. यासाठी स्वयंघोषीत महाराज घरी नसताना त्याच्या पत्नीकडे किशोर जावून वारंवार पैशाची मागणी करून शिवीगाळ व दमदाटी करीत होता. हि माहिती महाराज व त्याचा मेव्हणा सागर देसाई यांना कळाले. त्यांनी साथीदार राहुल शिंदे याची भेट घेवून किशोर गायकवाडचा काटा काढण्याचा कट मनात रचला. पुर्वनियोजीत कटाप्रमाणे 8 जुलै 2017 रोजी सुर्या ढाब्याच्या पाठीमागे राहुल हाईटस् या इमारतीमधील फ्लॅटमध्ये पैसे परत देण्याच्या बहाणा करून बोलाविले. त्या ठिकाणी त्याच्याशी वाद केला. वाद चालू असतानाच गाडीच्या क्लच वायरने किशोर गायकवाडचा गळा आवळण्यात आला. त्यानंतर डोक्यात लोखंडी रॉडने गंभीर दुखापत करून खुन केला. त्यानंतर किशोरचा मृतदेह स्वयंमघोषीत महाराजांनी वेरणा गाडीच्या डिकीमध्ये टाकून कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडच्या घनदाट जंगलात नेला. उंच कड्यावरून मृतदेह दरीत फेकून दिला. तसेच किशोरचा मोबाईल हँण्डसेट स्वत:जवळ ठेवून पुणे, मुंबई परीसरात गैरसमज पसरविण्यासाठी फिरविला आणि त्याठिकाणी टाकून दिला. आरोपींनी किशोरच्या मालकिची स्कार्पिओ गाडी पुणे, मंंबुई, नाशिक, नगरमार्गे अकलुज या ठिकाणी गाडी घेवून गेले. व त्याठिकाणी गाडी सोडली. हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणे हे खुनाचे रहस्य स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि उंब्रज पोलीस सयुक्त कारवाई करीत आठ महिन्यापुर्वीच्या खुनाला वाचा फोडली. यासाठी 72 तास पोलीसांनी आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर तपास अधिकार्यांसमोर आरोपींनी खुनाची कबुली दिली.
पो. नि. पद्माकर घनवट, स. पो. नि. विकास जाधव, पो. उप. नि. प्रसन्ना जर्हाड, सुरेंद्र पानसांडे, पृथ्वीराज घोरपडे, विजय शिर्के, उत्तम दबडे, रामा गुरव, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, मोहन घोरपडे, नितीन गोगावले, तानाजी माने, रूपेश कारंडे, विक्रम पिसाळ, मारूती लाटणे, निलेश काटकर, संजय जाधव, विजय सावंत, मारूती अडागळे, महिला पोलीस वैशाली घाडगे, मोना निकम यांनी कारवाई सहभाग घेतला. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सातारा पोलीस अधिक्षक संदिप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी या कामगिरीबद्दल सर्वांचे कौतुक केले.
उंब्रज खुन प्रकरणी सांगली जिल्ह्यातील स्वयंघोषित महाराजासह दोघांना अटक ; सातारा एलसीबी, उंब्रज पोलीसांची कारवाई
RELATED ARTICLES