Thursday, June 26, 2025
Homeठळक घडामोडीढाकणी येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी

ढाकणी येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी

म्हसवड : ढाकणी, ता.माण येथील ठेंबरेवस्तीवरील भीमराव शिंदे व शंकर ठेंबरे या चुलत मेव्हण्यांचा जुना वाद चार वर्षानंतर पुन्हा उफाळून आला असून बुधवारी रात्री 10 च्या सुमारास दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी होऊन यामध्ये तिघेजण जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.
याबाबतची फिर्याद सौ. छाया भीमराव शिंदे वय 50 रा.ढाकणी ता.माण यांनी म्हसवड पोलिसात दाखल केली असून याबाबत अधिक माहिती अशी, ढाकणी, ता. माण येथील ठेंबरेवस्तीवरील भीमराव शिंदे व शंकर ठेंबरे या चुलत मेव्हण्यांचा जुना वाद चार वर्षानंतर पुन्हा विहिरीच्या पाण्याच्या हिस्स्यावरून उफाळून आला असून आज रात्री 10 च्या सुमारास दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काट्या, तलवार, कुर्‍हाड व लोखंडी गज यांचा वापर करण्यात आला.
शंकर नामदेव ढेम्बरे, प्रकाश ढेम्बरे, प्रदीप ढेम्बरे, राजूबाई ढेम्बरे, स्वाती ढेम्बरे, शीतल ढेम्बरे, खेमा शिंदे,अंकुश नागरगोजे सर्व रा. ढाकणी, विलास कळले, कुबीर कळले,आंनदा कळले रा.वळई या सर्वांनी बेकायदा जमाव जमवून तलवार, काट्या,लोखंडी गज, व कुर्हाडीने फर्यादी सौ छाया शिंदे, फिर्यादीचे वडील मारुती ढेम्बरे,पती भीमराव शिंदे व बापू गेंड यांना मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सदर घटनेत फिर्यादी छाया शिंदे,मारुती ढेम्बरे बापू गेंड हे तिघेजण जखमी असून अधिक तपास डी वाय एस पी अनिल वडनेरे,म्हसवडचे सपोनि मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो स इ शहाजी गोसावी हे करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular