सातारा :- सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात मेडिकल सर्टिफिकेट घेण्यासाठी सामान्य नागरिक तसेच मजुरांची तुफान गर्दी अनेक लोकांना राज्याबाहेर तसेच जिल्हा अंतर्गत प्रवास करण्याच्या असल्यामुळे मेडिकल सर्टिफिकेट घेण्यासाठी लोकांच्या रांगच रांगा दिसत आहेत सुमारे दोन हजाराहून अधिक लोक या परिसरात जमले असून कोरोना अथवा सारीचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे त्यामुळे आता प्रशासनाने यावर तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
कोरोना टाळण्यासाठी सामाजिक कांतर आवश्यक असताना झालेली ही दोन हजार पेक्षा जास्त लोकांची गर्दी सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडवणारी आहे सातारा सिव्हिल सर्जन डॉक्टर अमोल गडीकर यांच्या बेजबाबदार प्रशासनाचा अनुभव लोकांना पाहायला मिळत आहे कोणाला बाहेर जायचे कोणाला लग्नाला जायचे अशी नाना कारणे सांगत हे लोक तपासणीसाठी सिव्हिल मध्ये दाखल झाले आहेत मात्र सामाजिक आंतर पाळायला लावण्यासाठी सिविल हॉस्पिटल चे प्रशासन काहीच करताना दिसत नाही तसेच इथे सुरक्षारक्षकही नाहीत आणि डॉक्टर हे नाहीत त्या त्यामुळे हा बेजबाबदारपणा सातारा शहराला अधिक संकटात टाकणारा ठरणारा आहे.