सातारा : श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या श्रीक्षेत्र सज्जनगडावर समर्थ सेवा मंडळाचेवतीने समर्थांचा पुण्यतिथी महोत्सव अर्थात दासनवमी महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे दि. 1 फेब्रुवारी ते 09फेब्रुवारी 2018 या कालावधीत संपन्न होत आहे. यावर्षी साजर्या होणार्या दासनवमी महोत्सवात भक्त निवासात 10 दिवस अनेक मान्यवरांची किर्तने, प्रवचन व गायन सेवा संपन्न होणार आहे.
महोत्सव काळामध्ये होणारे विशेष कार्यक्रम पुढीलप्रमाणे गुरुवार दि.1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2017 दरम्यान रोज सकाळी 8 ते 10 या वेळेत नितीनबुवा रामदासी व सौ. रसिकाताई ताम्हणकर यांचे मार्गदर्शंनाखाली दासबोध वाचन,दि.1 व 2 रेाजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत डॉ. अजित कुलकर्णी व दि.3 फेब्रुवारी ते 9फेब्रुवारी पर्यत ह.भ.प. गुरुनाथ महाराज कोटणीस यांची प्रवचने होणार आहेत. दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 6.30पर्यत दररोेज दासनवमी अखेर समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.
संगीत महोत्सवात गुरुवार दि.1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता श्रीमती मृणाल नाटेकर व नांदेड येथील अभिजीत अपस्तंभ यांचे गायन होणार असून त्यांना साथ संगत तबल्यावर सागर पटोकार व संवादिनीवर अभिषक सिनकर हे करणार आहेत.शुक्रवार दि.2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सौ. कविता खरवंडीकर यांचे गायन होणार असून त्यांना साथ संगत धनंजय खरवंडीकर व उदय कुलकर्णी करणार आहेत.
शनिवार दि.3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सौ. अपर्णा गुरव यांचे गायन होणार असून त्यांना साथ संगत मिलींद गुरव, प्रणव गुरव व स्वानंद कुलकर्णी करणार आहेत. रविवार दि.4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पं.शौनक अभिषेकी यांचे गायन होणार असून त्यांना साथ संगत चारुदत्त फडके व तन्मय देवचके करणार आहेत.सोमवार दि.5 रोजी सायंकाळी 7 वाजता पं.आनंद भाटे यांचे गायन होणार असून त्यांना साथ भरत कामत व सुयोग कुंडलकर करणार आहेत.
मंगळवार दि.6 रोजी सायंकाळी 7 वाजता सौ. शिल्पा पुणतांबेकर यांचे सुगम संगीत व त्यानंतर पं. सतीश व्यास यांचे संतुर वादन होणार आहे. त्यांना पं.विजय घाटे यांची तबला साथ असून समीर पुणतांबेकर व दिप्ती कुलकर्णी या संवादिनी साथ करणार आहेत.
बुधवार दि.7 रोजी सायंकाळी 7 वाजता पं. जयतीर्थ मेवूंडी यांचे गायन होणार असून त्यांना साथ संगत सुयोग कुंडलकर करणार आहेत.
गायन महोत्सवाची सांगता गुरुवार दि.8 रोजी सायंकाळी 7 वाजता अमर ओक यांचे बासरी वादन होउन सौ.मंजुषा पाटील यांचे गायनाने होणार असून त्यांना साथ संगत प्रशांत पांडव रोहित मराठे व प्रसाद जोशी करणार आहेत.
दासनवमी महोत्सवाची सांगता शुक्रवार दि.9फेब्रुवारी रोजी सकाळी दासबोध वाचन, कीर्तन व महाप्रसादाने होणार आहे.या सर्व कार्यक्रम समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस,कार्यंवाह समर्थ भक्त मारुतीबुवा रामदासी,कोषाध्यक्ष योगेशबुवा पुरोहित रामदासी व कार्याध्यक्ष अॅड.डॉ.डी.व्ही. देशपांडे यांनी केले आहे.
सज्जनगडावर दासनवमीनिमित्त समर्थ सेवा मंडळाचे विविध कार्यक्रम ; दासबोध वाचनासह दिग्गज गायक,वादकांच्या मैफिलींचे आयोजन
RELATED ARTICLES