म्हसवडः ग्रामीण दुष्काळी भागाता मुलांना शहरी भागातील मुलांप्रमाणे समर कॅम्प (उन्हाळी शिबीर) चे आकर्षण असते आणि लहान मुलांचे स्वप्नही असते परंतू परिस्थिती अभावी मुलांना आपली स्वप्न पुर्ण करता येत नाहीत हेच स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य माणदेशी फोंडेशनने माणदेशी चॅम्पीयन्सच्या माध्यमातून म्हसवड येथे केले आहे.
आज माणदेशीच्या मातीतून अनेक यशस्वी तारे चमकले आहेत माणदेशीच्या डंका आज विविध क्ष्रेत्रात वाजत आहे क्रिडा, प्रशासकीय, व्यवसाय, उद्योगधंदे या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आज ललिता बाबर, सरिता भिसे, रेश्मा केवटे, वैष्णवी सावंत यांनी क्रिडा क्षेत्रात गरुड भरारी घेतली आहे त्यांनी आपल्या देशाचे राज्याचे माणदेशीचे नाव उज्वल असे केले आहे माणदेशीची मातीच वेगळी आहे दगडालाही पाझर फोडण्याची क्षमता ही माणदेशीच्या लोकांमध्ये आहे माणदेशीच्या माध्यमातून ग्रामिण भागातील मुलांसाठी मोफत उन्हाळी शिबीर थलेटीक्स खेळ, सर्किट जिम, ट्रेकिंग यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन या शिबीरात केले आहे या उन्हाळी शिबीरामध्ये 245 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. जास्तीत जास्त मुलांनी या उन्हाळी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा केले. यावेळी वंदना भन्साली, अरूण गाला व माणदेशी फौंडेशन आणि माणदेशी चॅम्पियन्स चे सर्व सदस्य उपस्थित होते.
दगडाला ही पाझर फोडण्याची क्षमता माणदेशी लोकांमध्ये आहेः चेतना सिन्हा
RELATED ARTICLES