वडूज: दहिवडी (ता. माण) येथे असलेल्या प्रत कार्यालयात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरु आहे. या अनागोंदीमुळे सर्वसामान्य नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या कारभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी विसापूर (ता. खटाव) येथील मारुती खंडू साळुंखे व इतर ग्रामस्थांनी केली आहे.
श्री साळुंखे व त्यांच्या सहकार्यांनी विसापूर येथील घुमट माळावरील विलास दादा जाधव यांच्या पोल्ट्रीच्या दुर्गधीविरोधात वडूज तहसिल कार्यालय, दहिवडी प्रांत कार्यालय या ठिकाणी लोकशाही मार्गाने अर्ज, विनंत्या, तक्रारी, आमरण उपोषण, आत्मदहन आंदोलन या मार्गाने लढा दिला. आही दिलेले म्हणणे, आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग यांचे म्हणणे घेवून प्रांताधिकार्यांनी 24/12/2018 रोजी पोल्ट्री बंद करण्यासंदर्भात आदेश दिले होते.
या आदेशाविरोधात पोल्ट्री मालक श्री. जाधव यांनी वडूज येथील अतिरीक्त सत्र न्यायालयात अपिल दाखल केले. या अपिलाच्या सुनावणीवेळी प्रांताधिकार्यांनी पोल्ट्री फार्मच्या जागेवर समक्ष भेट दिली नाही. तसेच आरोग्य विभाग व प्रदूषण नियंत्रण विभागाचा अहवाल जोडला नाही. या कारणावरुन सत्र न्यायाधिशांनी दि. 18 मार्च 2019 रोजी हे प्रकरण पुन:श्च्य न्यायनिवाड्यासाठी प्रांत कार्यालयाकडे पाठविले आहे. वास्तविक पाहता आरोग्य विभाग व प्रदूषण नियंत्रण विभागाचा अहवाल त्यांचा मुलगा संदिप मारुती साळुंखे व ग्रामविकास अधिकारी श्री. पवार यांनी दहिवडी येथे जावून समक्ष प्रांताधिकार्यांच्या हाती दिला होता. असे असतानाही कोर्टासमोर ते पुरावे सादर केले गेले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने प्रांताच्या निर्णयास स्थागिती देण्याबरोबर हे प्रकरण फेरचौकशीसाठी पुन:श्च प्रांत कार्यालयातच पाठविले आहे. या प्रकरणी हलगर्जीपणा करणारे टेबल कारकून व त्यांना पाठीशी घालणार्या अधिकार्यावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा लोकसभा निवडणूकीची आचारसंहित संपल्यानंतर आंदोलनाचा मार्ग पत्करला जाईल असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, पालकमंत्री विजयबापू शिवतारे, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
याबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कार्यालयातून कागदपत्रे गहाळ होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. सद्या आपण निवडणूकीच्या कामात व्यस्त आहोत. वेळ मिळाल्यानंतर नक्की काय झाले ते पाहून घेतो.
दहिवडी प्रांताधिकारी कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करावी
RELATED ARTICLES