वडूज : दरजाई (ता. खटाव) येथील ग्रामदैवत श्री दर्यादेवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त कै. वसंतराव पाटोळे यांचे स्मरणार्थ रविवार दि. 7 रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या मैदानात पुणे येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राचा पै. संतोष पडळकर व सह्याद्री संकुलाचा पै. सतपाल सोनटक्के यांच्यामध्ये 75 हजार इनामाची प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी सह्याद्री संकुलाचा मल्ल व मांडवेचा सुपुत्र पृथ्वीराज पाटील विरुद्द दिपक पाटील पुणे यांच्यामध्ये 51 हजार इनामासाठी लढत होणार आहे. याशिवाय राजू हिप्परकर पुणे विरुध्द अनिकेत पाटील पुणे, महेश कुंभार सह्याद्री संकुल विरुध्द अनिकेत चव्हाण, अक्षय जाधव साप विरुध्द रवी चव्हाण पुणे या प्रमुख लढती होणार आहेत. यातील विजेत्या मल्लांना अनुक्रमे 41 हजार, 31 हजार, 21 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. दरजाईची वृषाली पाटोळे विरुध्द वाणेवाडी येथील वनिता तोरवे यांची खास प्रेक्षणीय महिला कुस्ती होणार आहे. या कुस्ती मैदानासाठी आ. शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप विधाते, पै. संदिप मांडवे, संतोष साळुंखे, डॉ. महेश गुरव, बाळासाहेब जाधव, विपुल गोडसे, सी. एम. पाटील, नंदकुमार गोडसे, आनंदराव भोंडवे, अर्जुनराव वलेकर आदी मान्यवरांनी निमंत्रित केले आहे.
दरजाई येथे दि. 7 रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान
RELATED ARTICLES