सातारा : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात दारू दुकाने बंद करून दारूबंदी तालुका करण्यात आला. पण, काल निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदरच सायगाव गावातील रस्त्यावर रुग्णवाहिका मध्ये बेकायदेशीर विदेशी दारू पकडून देण्यात आली आहे. यामुळे भाजप उमेदवार अडचणीत सापडले आहेत.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात अटीतटीची निवडणूक होत आहे.काही दिवसांपूर्वी सातारा-जावळीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व भाजपचे दिपक पवार हे प्रतिस्पर्धी होते. दोघांनीही राजकीय पक्ष बदलून एकमेकांच्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी स्वीकारली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री सायगाव ता. जावळी येथे एका रुगवाहिका मधून विदेशी दारू वाटप करण्यासाठी वाहतूक करताना सायगाव येथील युवक कार्यकर्त्यानी ही बाब लक्षात आणून दिली. त्यामुळे पोलिसांनी रुग्णवाहिका व त्याचा चालक याला पकडून ताब्यात घेतले आहे.घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिपक पवार यांनी याबाबत भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वर निशाणा साधण्याची संघी मिळाली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जेवणावळी घातली होती. यामध्ये मांसाहार सोबत दारूचे ही वाटप करूनही स्वतःला ह. भ. प. म्हणून घेणार्या काही समर्थकांनी मौनधारण केले होते. त्याला धडा शिकवला पाहिजे म्हणून ही दारू पकडल्याची चर्चा सायगाव परिसरात सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप उमेदवार भोसले हे अडचणीत सापडले आहेत. सातारा जिल्ह्यातील अनेक भागात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाच्या माध्यमातून वाहनांची कडक तपासणी होत आहे. सामान्य वाहन चालकांना वेठीस धरले जाते. त्यामुळे पूर्वश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थक व विकास नगर(खेड) येथील कामेश कांबळे मित्र मंडळ यांनी आपल्या आजीच्या स्मरणार्थ दिलेल्या रुग्ण वाहिके मधून बेकायदेशीर दारू सामग्री वाहतूक करताना पकडून दिल्याने खळबळ माजली आहे. सातारा जिल्ह्यात लोकसभा पोट निवडणूक व विधानसभेच्या आठ जागेसाठी होणार्या निवडणूकीच्या निमित्ताने मतदान निर्भय व मुक्त वातावरणात व्हावे यासाठी परवानाधारक दारू दुकाने बंद करण्यात आली होती. अशा वेळी कोणत्या परवानाधारक दारू दुकानातून?कोणासाठी?कोणाच्या सांगण्यावरून?ही दारू दारूबंदी असलेल्या जावळी तालुक्यात आणण्यात आली याचा खोलवर तपास करून निवडणूक आयोगाने जनतेला माहिती दयावी व दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून रुग्णवाहिका संबंधितांचार इडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन ब्ल्यू फॉर्सचे दादा ओव्हाळ, मदन खंकाळ, किरण बागडे यांनी केली आहे.
सायगाव येथे ग्रामस्थांनी रुगवाहिका मधील दारू साठा पकडला
RELATED ARTICLES