सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतक-यांच्या, सर्वसामान्यांच्या आर्थिक व सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांच्या अर्थसहाय्याच्या गरजा विचारांत घेवून अनेकविध योजना राबविल्या आहेत ़ यामुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ भागातील शेतकरी, सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणेस मदत झालेली आहे ़
बँकेने ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्राहकांना बँकिंग सुविधा व सेवा त्वरित उपलब्ध व्हाव्यांत याकरिता 272 शाखा व 46 विस्तारीत कक्षांचे जाळे कृषी-सहकारी क्षेत्रात निरंतर कार्य करीत आहे ग़्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण बँकेने गतीमान करणेसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत ़ कृषि व कृषिपूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतीचे उत्पादन वाढविणेसाठी शेतकरी सभासदांचे आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांचे रहानीमान उंचावणेसाठी बँक जलसिंचन, कृषि यांत्रिकीकरण, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री, जमीन सुधारणा,शेतकरी निवास, सामान्य कर्ज, ग्रामीण शौचालय इत्यादि विविध योजनांसाठी तसेच जिल्हयातील सहकारी साखर कारखाने, सह ़ खरेदी विक्री संघ, दूध पुरवठा संघ, पगारदार नोकरांच्या सह ़ पतसंस्था, बँका इत्यादि संस्थांना त्याचप्रमाणे बँकेच्या व्यक्तीगत ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन व अन्य गरजांसाठी सोनेतारण कर्ज व्यवहारांपासून वाहन खरेदी, व्यवसायासाठी मोठया प्रमाणावर कर्ज पुरवठा करीत आहे ़ पिक कर्जापासून ऊस तोडणी यंत्रापर्यंत व सायकलपासून पोकलँन्ड पर्यंत कर्जाची सुविधा निर्माण केलेली आहे ़ यामुळे सातारा जिल्हा बँक सर्वसामान्यांचे कुटुंबाचे आर्थिक प्रगतीचा हिस्सा बनली आहे ़
बँकेने व्यक्तिगत थेट कर्जे योजनेंतर्गत शैक्षणिक कर्ज, नवीन वाहन खरेदी कर्ज, सोनेतारण कर्ज, हायरपरचेस, ऊस तोडणी यंत्र, व्यवसाय उभारणीसाठी मध्यम मुदत कर्ज, व्यवसाय वृध्दीसाठी कॅश क्रेडिट कर्ज, गृह कर्ज इत्यादि स्वरूपाच्या विविध योजनांव्दारे व्यक्तिगत ग्राहकांना कर्ज पुरवठा सुरू आहे ़ अशा नाविण्यापूर्ण व ग्राहकोपयोगी कर्ज योजना बँकेने प्रभावीपणे कार्यान्वित केल्या असून याचाच एक भाग म्हणूनबेँकेने जिल्हयातील ग्राहकांसाठी दिपस-रात्र सोनेतारण कर्ज व लॉकर सुविधा अशी अभिनव कर्ज योजना सुरू केली आहे ़ या योजनेमध्ये सातारा जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेतील खातेदार ग्राहकांना कार्यालईन वेळेव्यतिरिक्त सोनेतारण कर्ज व लॉकर सुविधा उपलब्ध होणेकरिता बँकेने मुख्यालयातील कॅम्प, सातारा शाखेत दुपारी 3-30 ते रात्री 8-30 वाजेपर्यंत या दोन्ही सुविधा उपलब्ध होणार आहेत ़
या सुविधांचा शुभारंभ गुरूवार दिनांक 7 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3-30 वाजतां बँकेचे अध्यक्ष मा ़आ ़ श्रीमंत छ ़ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे शुभहस्ते व उपाध्यक्ष श्री ़ सुनिल माने यांचे अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाचे उपस्थितीमध्ये होणार असलेचे मुख्य कार्यकारी डॉ ़ राजेंद्र सरकाळे यांनी कळविले आहे ़
बँक कामकाज वेळेनंतर अशा सुविधा देणारी ही राज्यातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असून ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळणेकरिता हा नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रम राबविला आहे ़ लवकरच तालुक्यांचे ठिकाणी व प्रमुख शाखांमध्ये या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, तरी, या सुविधा शुभारंभास ग्राहकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ़ राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे ़
जिल्हा बँकेच्या सोनेतारण कर्जव्यवहार व लॉकर सुविधेचा शुभारंभ
RELATED ARTICLES