सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खेड बु।्। ता .खंडाळा या नवीन शाखेचे उदघाटन शनिवार दि. 24/08/2019 रोजी बँकेचे जेष्ठ संचालक व महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सभापती मा .ना .श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांचे शुभहस्ते आणि मा .आ .श्री .मकरंद पाटील यांचे अध्यक्षतेखाली तसेच बँकेचे संचालक मा .श्री .दत्तात्रय ढमाळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, जि.प.कृषि सभापती श्री. मनोज पवार, माजी सभापती श्री. रमेश धायगुडे, उपसभापती सौ. वंदना धायगुडे, सरपंच सौ.रंजना धायगुडे, पंचायत समिती सदस्य सौ. अश्विनी पवार, बँकेचे व्यवस्थापक श्री .नाना लंगुटे, उपव्यवस्थापक श्री .मदन शिंदे, ग्रामपंचायत सरपंच/सदस्य, वि .का .स .सेवा सोसायटीचे चेअरमन/सदस्य,बँकेचे अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला .
मा .ना .श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, बँकेची खेड बु।्। ता .खंडाळा या ठिकाणी नवीन शाखा सुरु होत असलेमुळे ग्राहकांना उत्तम सेवा-सुविधा मिळणार आहेत .देशात सहकार क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळविलेल्या बँकेची या ठिकाणी शाखा सुरु होत आहे ही चांगली बाब आहे .आपल्या बँकेने सहकारी बँकिंगपुढे चांगला आदर्श निर्माण केलेला आहे .खंडाळा तालुक्यामध्ये औद्योगिकीकरणाचे प्रमाण वाढलेले असून उद्योग व्यवसायासाठी कर्ज पुरवठ्यासाठी चांगला वाव आहे. या ठिकाणी पाणी उपलब्ध असलेने शेतकरी सभासदांना शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी पुरेशा प्रमाणात कर्जपुरवठा झाला पाहिजे .खेड बु।्। परिसरातील ग्राहकांना बँकेच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध होतील याचा परिसरातील ग्राहकांनी शाखेच्या माध्यमातून विविध बँकिंग सेवा सुविधांचा लाभ घ्यावा .
मा.आ. श्री..मकरंद पाटील म्हणाले जिल्हा बँकेची शाखा व्हावी ही खेड बु गावातील ग्रामस्थांची इच्छा पूर्ण झाली असून शाखेच्या ठेवी वाढविणेसाठी परिसरातील ग्रामस्थांनी प्रयत्न करून बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा. बँकेने विकास संस्था सक्षम व्हाव्यांत व त्यांचे निधीमध्ये वाढ व्हावी म्हणून प्रत्येक वर्षी नफ्यातून वसुलीपोटी प्रोत्साहन रक्कम दिल्यामुळे विकास संस्था सक्षम होण्यास मदत झाली आहे . सहकारी बँकांपुढे अनेक आव्हाने असून बँकेने ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देणेसाठी कोअर बँकिंग प्रणालीचा उपयोग केला आहे, ग्राहकांना आर.टी.जी.एस./ एन.ई.एफ.टी., एस.एम.एस. सुविधा, मोबाईल बँकिंग, इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेच्या उत्कृष्ठ कामकाजामुळे बँकेस जवळपास ऐंशी हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले असून बँकेचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला आहे. बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रापुढे चांगला आदर्श निर्माण केला असून ग्राहकांनी बँकेच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी संचालक श्री. दत्तानाना धमाळ म्हणाले, खेड बु परिसरातील ग्राहक व ग्रामस्थांच्या बँकिंग विषयी असणार्या अपेक्षा या शाखेच्या माध्यमातून निश्चितच पूर्ण होतील. बँकेने 273 शाखांच्या व 46 विस्तारीत कक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागात सेवेचे अत्यंत चांगले जाळे निर्माण केले आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले बँकेच्या उत्कृष्ट कामकाजामुळे नाबार्डने सलग 6 पुरस्कार देऊन गौरविले असून बँकेने सहकार क्षेत्रात चांगल्या कामकाजाचा ठसा उमटविलेला आहे. बँकेच्या स्वमालकीच्या एकूण 42 इमारती असून बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. बँकेने शंभरहून अधिक कर्ज योजनांच्या माध्यमातून चांगले कामकाज केले आहे. या बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,अध्यक्ष मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. बँकेने अधिकाधिक सामान्य ग्राहकांना बँकिंग सेवा सुविधा मिळाव्यात या करिता शहरी व ग्रामीण भागात शाखा कार्यान्वित केलेल्या आहेत. समाजातील दूर्लक्षित व बँकिंग प्रवाहापासून दूर असणा-या जास्तीत जास्त घटकांना बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मोबाईल बँकिंग एटीएम व्हॅन सुरु करुन बँक आपल्या दारी म ही संकल्पना साकार केली आहे . बँक विकास संस्थेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे आर्थिक जीवनमान उंचावणेसाठी कटीबद्ध आहे.
बँकेने विकास सेवा संस्थांचे कर्ज वसुलीसाठी चांगले नियोजन केलेले असून खेड बु विकास सोसायटीची वसुली 100 % होणे करिता सर्व सभासदांनी सहकार्य करणेचे आवाहन केले.
या कार्यक्रमास परिसरातील ग्राहक, शेतकरी, ग्रामस्थ, सहकारी संस्थांचे पदाधिकारी/अधिकारी, मार्केट कमिटी संचालक, महिला बचतगटांचे सदस्या, जेष्ठ नागरिक, तरुण मोठया संख्येने उपस्थित होते .
खेड बु।्। परिसरातील ग्राहकांनी विविध बँकिंग सेवा सुविधांचा लाभ घ्यावा : ना. रामराजे
RELATED ARTICLES

