Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीसातारा जिल्हा बँकेचे कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था व सहकारातील काम आदर्शवत

सातारा जिल्हा बँकेचे कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था व सहकारातील काम आदर्शवत

सातारा : सहकारी बँकिंग क्षेत्रात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशात नामांकित असून या बँकेने सहकारी कृषी क्षेत्रात दूरदृष्टीने केलेल्या उपाययोजनेच्या यशोगाथेमागे असणार्‍या कार्यप्रणालीचा आणि जिल्ह्यातील विकास सेवा संस्था अनिष्ट तफावतीतून इष्ट तफावतीमध्ये येण्यासाठी तसेच विकास सेवा संस्था सक्षमीकरनासाठी बँकेने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी उत्तर प्रदेश, राज्य सरकार आणि लखनौ सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट आयोजित केली होती.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था व सहकारातील काम आदर्शवत असलेचे प्रतिपादन उत्तर प्रदेश सहकारी बँकेचे संयुक्त आयुक्त आणि निबंधक योगेंद्र मलिक यांनी केले.
अभ्यास भेटीसाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेने सेवेचे जाळे ग्रामीण भागातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविले असून अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बँकेने आर.बी.आय./ नाबार्ड यांचे नियम व निकष तंतोतंत पाळले आहेत. बँक स्थापनेपासून ऑडीट वर्ग अ, 0% छझ ची परंपरा, शेतकरी मंडळासाठीचे उल्लेखनीय कार्य, विकास संस्था सक्षमीकरण, विकास संस्थाना बिझनेस डेव्हलपमेंट प्लान अंतर्गत इतर व्यवसायास अर्थसहाय्य व मार्गदर्शन, बँक राबवीत असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा,सामाजीक बांधिलकी यामुळे बँकेचा नावलौकिक देशभर झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील विकास सेवा संस्था अनिष्ट तफावतीतून इष्ट तफावतीमध्ये येण्यासाठी बँकेने अंमलबजावणी केलेल्या धोरणांची तपशीलवार माहिती आणि बँक सलग्न विकास सेवा संस्था सक्षमीकरनासाठी बँक करीत असलेल्या उपाययोजनाची माहिती डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सादर केली.
याप्रसंगी उत्तर प्रदेश सहकारी बँकेचे प्रबंध निर्देशक अंजुम खान म्हणाले, बँकेच्या ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ट वसुली नियोजन, शून्य टक्के निव्वळ एन. पी. ए., दर्जात्मक कामकाज, संस्थापातळीवर पारदर्शक व्यवहार होणेसाठी सुरु केलेली ट्रीपलिकेट चलन पद्धती, आणि सामाजिक बांधिलकी यामुळे संस्था व सभासद यांचे बँकेशी असलेले नाते वृदिंगत झाले आहे.
सहकाराचा अभ्यास हा सातारा जिल्हा बँकेस भेट दिल्याशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नसलेबाबत श्री. खान यांनी प्रतिपादन केले.
सुनीलचंद्र श्रीवास्तव, उपसचिव, केडर यांनी सातारा जिल्हा बँक ही देशातील एक आदर्शवत बँक असून इतर सहकारी बँकांसाठी रोल मॉडेल असलेचे गौरवोदगार काढले.ग्रामीण भागातील सभासदांच्या कल्याणासाठी व देशाच्या कृषी उत्पादनात भरघोस वाढीसाठी सहकाराच्या माध्यमातून उत्कृष्ट कामकाज केलेले असलेचे पहावयास मिळाले. सातारा जिल्हा बँकेने आम्हास चांगले मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. सातारा जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी आम्हाला दिलेली उपयुक्त माहिती आणि वेळ दिल्या बद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक श्री. सुजित शेख यांनी केले. यावेळी, जिल्हा बँकेतील सरव्यवस्थापक श्री मधुकर जाधव, राजीव गाढवे, व्यवस्थापक श्री. राजेंद्र भिलारे, संजय इथापे तसेच सर्व विभागांचे उपव्यवस्थापक, अधिकारी व सेवक उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular