कराड : सध्या डेंग्यू आजाराने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये आरोग्य विभाग सर्व्हे करत असून शुक्रवारी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये, अतिरिक्त जिल्हा अधिकारी सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी शहरात घरोघरी फिरून डेंग्यूंची माहिती घेतली व नागरिकांना सूचना केल्या.
कराड शहरामध्ये डेंग्यूच्या आजाराने नुकताच एका बालिकेचा दुदैवी अंत झाला. तर तीन महिन्यांमध्ये शहरात दोन लहान मुलींसह तिघांना जीव गमवावा लागला. यंदा झालेल्या महापुरामुळे ही साथ पसरली असून शहरात डेंग्यूच्या डांसाची पैदास होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर डॉ. अनिरूध्द आठल्ये, डॉ.सचिन पाटील यांनी आरोग्य विभागाची मिटींग घेवून शहराचा आढावा घेतला तसेच डॉक्टरांची टिम करून शहरातील घरोघरी जावून याबाबतची माहिती देण्याच्या सूचना केल्या. तसचे नागरिकंाना संतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार डॉ. संगिता देशमुख, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल कुलकर्णी तसचे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी शहरातील घरोघरी जावून पाहणी केली. त्यावेळी अनेक घरांमध्ये बॅरलच्या पाण्यात, फ्रिजमध्ये, घराशेजारी साठवून ठेवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या आळया सापडल्या असल्याचे निदर्शनास आले. तसेच नागरिकांना पाण्यातील आळया दाखवण्यात येवून डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी भंगार साहित्य, कुंडया, घरातील फ्रीज याची पाहणी केली.
यावेळी शहरामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप झाल्याचे रूग्ण आढळून आले नाहीत, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. मात्र अनेक नागरिकांच्या घरातच डेंग्यूच्या आळया, अंडी सापडल्या असून नागरिकांनी पाणी साठवून ठेवू नये, स्वच्छता ठेवणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
योवळी नगरपालिका आरोग्य कर्मचारी, ग्रिनी टिम, नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी सर्व्हे करत आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकार्याकडून कराड शहरातील डेंग्यूचा सर्व्हे
RELATED ARTICLES