Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीराष्ट्राचा विकासदर उंचवण्याचे सामर्थ्य प्रत्येक महिलेच्या हातात : डॉ. सौ. भोसले

राष्ट्राचा विकासदर उंचवण्याचे सामर्थ्य प्रत्येक महिलेच्या हातात : डॉ. सौ. भोसले

भुईंज : महिलेला संधी मिळाल्यास ती संधीच सोन करतेच पण त्याहून स्वतःच्या कुटुंबाबरोबरच गावाचा व राष्ट्राचा विकासदर उंचवण्याचे सामर्थ्य प्रत्येक महिलेच्या हातात आहे. त्यासाठी तिला योग्य मार्गदर्शन व स्वयमं रोजगाराच्या संधीची माहिती करून दिली पाहिजे असे प्रतिपादन डॉ.सौ.निलीमा भोसले यांनी महिला दिनांनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
भुईंज ता.वाई येथे श्री.महालक्ष्मी शिक्षण संस्था व श्री महालक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त सहभागाने महिला दिनाचे औचित्य साधून डिझायनर रझई ह्यगोधडीहृ बणविण्याची मोफत कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना डॉ.सौ.निलीमा भोसले बोलत होत्या. यावेळी प्रशिक्षिका सौ.उज्वल जोशी़ भुईंजच्या सरपंच पुष्पा भोसले़ माजी सरपंच अनुराधा भोसले आदी मान्यवर उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डॉ.सौ.निलीमा भोसले पुढे म्हणाल्या की 21 वे शतक हे स्वयं रोजगाराचे शतक आहे. औद्योगिक क्षेत्राचा खरा आधारस्तंभ हा लघु आणि कुटीर उद्योग आहे. त्यात महिलांचे योगदान मोठे आहे. महिलांना कला कौशले कामे सुबकपणे करतात. कष्ट व प्रामाणिकपणा जोपासात त्या उत्पादनाची उत्पादकता वाढू शकतात. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण व अनुभव मिळाल्यास त्या स्थानिक बाजारपेठेचा वेध घेत यशस्वी होवू शकतात. महिलेला संधी मिळाली तिला स्वयमं रोजगार प्रशिक्षण मिळाले तर ती प्रामाणिक पणे त्याला योग्य तो न्याय देत संधीचे सोनं करते अशी अनेक उदाहरणे आपल्या सभोवताली असतात परंतु प्रत्येक महिलेने मी सुद्धा हे करू शकते असा आत्मविश्‍वास जागृत करून आपल्या हातांना कला कौशल्य मिळवण्यासाठी प्रशिक्षणे कार्यशाळा यात सहभाग घेतला पाहिजे. श्री.महालक्ष्मी शिक्षण संस्था व श्री महालक्ष्मी महिला बीगर ग्रामीण सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त सहभागाने महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी असे कार्यक्रम करून महिलासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दयायची जबाबदारी स्विकारते असे सांगून महिलांच्या कोणत्याहि अडी अडचणीसाठी संस्थेमार्फत प्रयत्नशील असणार असल्याची हे सांगितले.
तर यावेळी बोलताना प्रशिक्षिका सौ.उज्वल जोशी म्हणाल्या की डिझायनर रझई हि संकल्पना पारंपारिकता जोपासत नाविन्याची जोड देत स्वतःचा व्यवसाय तो हि कुटुंब सांभाळत करता येतो यातून प्रत्येक महिलेने स्वतःचे अस्तित्व व कौशल्ये सिद्ध करण्याची योग्य संधी आहे.
प्रारंभी सहभागी प्रशिक्षणार्थी महिलांनी बनवलेल्या डिझायनर रझईंची पाहणी मान्यवरांनी केली. कार्यक्रमास महिला पतसंस्थेच्या चेअरमन सुनंदा मोहिते़ व्हा.चेअरमन मनिषा जाधव़ संगिता भोसले़ संगिता खरे़ कविता भोसले़ रोहिणी शिंदे़ सुरेखा भोसले़ शकुंतला वालेकऱ रूपाली गोरे़ रूपाली जाधव़ वैजयंता घोणे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या प्राचार्या संगिता शिंदे यांनी केले तर आभार महिला पतसंस्थेच्या संचालिका शैला पिसाळ यांनी मानले. सुत्रसंचालन सौ.शिला जाधव यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular