Tuesday, December 2, 2025
Homeठळक घडामोडीढाकणी ग्रामपंचायत कार्यालय शॉर्टसर्किटने जळून खाक

ढाकणी ग्रामपंचायत कार्यालय शॉर्टसर्किटने जळून खाक

(छाया : विजय भागवत)
म्हसवड : ढाकणी, ता.माण ग्रामपंचायत गुरूवारी रात्री लाईटचा कमी-अधिक दाब होऊन शॉर्टसर्किट झाल्याने संपुर्ण कार्यालय जळून खाक होऊन सुमारे पावणे पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याची तक्रार उपसरपंच कृष्णांत खाडे यांनी पोलिसात दाखल केली आहे.
याबाबतची घटनास्थळावरून व पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी माण तालुक्यातील ढाकणी हे गांव सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेले गांव आहे.या गावा मध्ये मागील दोन महिण्यापासून विज वितरण कंपनी कार्यालयाकडून हे गांव बेदखल आहे.सदर कार्यालयाकडे नागरिकांनी अनेक वेळा लाईटचा दाब कमी अधिक होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र सदर कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.परिणामी गावात काल गुरूवार दि.28रोजी रात्री अचानक लाईटचा दाब कमी अधिक झाल्याने ग्रामपंचायत कार्यालय जळून खाक झाले  असून गावातील काहीचे टीव्ही जळले आहेत.
ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्वात जास्त नुकसान झाले असून कॉम्प्युटर, कि बोर्ड, माऊस,प्रिंटर,एक वेब कॅमेरा, एक टेबल, जॉब कार्ड,   त्याची नोंदवही, नरेगा मस्टर एम.बी, नमुना क्रमांक एक फाईल,  2ते10 नमुना नं.8कॉम्प्युटर प्रिंट, एक अर्ज फाईल, बी.बी.एन.एल.ब्रॉ बॅन्ड नविन कन्क्शन संच पुर्ण, फाईल वर्क ऑर्डर फाईल प्रधानमंत्री आवास योजना रजि.फाईल(प्रस्ताव) तसेच कार्यालयातील कपाटे खर्चा इतर साहित्य जळून नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती समजताच माणच्या तहसिलदार सुरेखा माने गटविकास अधिकारी जे.डी.शेलार सरपंच रूपाली खाडे ग्रामविस्तार अधिकारी मोरे सर्कल अहिवले ग्रामसेवक महेश ताम्हाणे सपोनि मालोजीराव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली तर  बीट हवलदार ऐ.एम.कांबळे एस.एस.सानप नितिन धुमाळ हवलदार खाडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
याबाबत सपोनि मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हावलदार ऐ.एम.कांबळे पुढील तपास करत आहेत.
ढाकणी ता.माण ग्रामपंचायत कार्यालय हे शाळेच्या जवळ असून ही घटना रात्रीच्या वेळी घडली तसेच आसपास घरं नसल्याने या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने इतर कुठलीही हानी झाली नाही.
ऐवढी मोठी आग शॉर्टसर्किटमुळे लागून सुमारे पाऊनेपाच लाख रूपयांचे नुकसान झाले.संपुर्ण ग्रामपंचायत कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी जळून खाक झाले तरीही विज वितरणचे अधिकार्यानी भेट देण्याचे सौजन्य दाखवले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला..  
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular