कराड : कार्वे (ता. कराड) येथील महाराष्ट्राचे उपशक्तीपीठ असणार्या श्री धानाई-जाकाईदेवी देवस्थानाला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ब वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा दर्जा प्राप्त झाला असून, याबाबतचा शासन आदेश गुरूवारी (ता. 20) प्रसारित करण्यात आला आहे.
श्री धानाई-जाकाईदेवी हे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात होणार्या देवीच्या यात्रेला भाविक मोठ्या संख्येने येत असतात. या देवस्थानला बफ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा यासाठी नामदार डॉ. अतुल भोसले यांनी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार ग्रामविकास विभागाने तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत बफ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा प्रदान केला. यामुळे या देवस्थानच्या विकासासाठी 2 कोटी रूपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या माध्यमातून मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, वाहनतळाची उभारणी, रस्त्याची डागडुजी, पथदिवे व हायमास्ट दिव्यांची उभारणी, यात्री निवास, संरक्षक भिंतीची बांधणी तसेच बागेचे सुशोभीकरण अशी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. कराड दक्षिण मतदारसंघात बफ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळविणारे हे पहिलेच तीर्थक्षेत्र ठरले आहे.
कार्वे धानाई-जाकाई देवस्थानास ब वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा; नामदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश; विकासासाठी मिळणार 2 कोटींचा निधी
RELATED ARTICLES