मेढा ( वार्ताहर ):- मेढा येथिल सामाजिक कार्यकर्ते श्री. धनंजय ज्ञानेश्वर पवार यांची वढू आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समितीच्या जावली तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
मेढा येथिल पवार यांची सामाजिक कार्याची दखल घेत या समितीमधील पदाधिकारी यांनी त्यांची सर्वानुमते निवड केली आहे.या कार्यात आपण समाज हिताचे कार्य पार पाडाल आणि आपल्या कर्तव्याचे पालन करा अशी सुचना दिली असून त्यांचे या निवडीबद्दल वढू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समिती श्री रायगड संस्थान जामखेडचे संस्थापक शिवशाहीर श्री.आकाश भोंडवे पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल मेढा आणि परिसरातील मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
धनंजय पवार यांची पालखी सोहळा समितीच्या जावली तालुकाप्रमुख पदी निवड
RELATED ARTICLES