ढेबेवाडी: प्रलंबित मागण्याबाबत शासनाने मंत्रालयात बैठक लावून त्वरीत निर्णय घ्यावा या मागणीसाठी धरणग्रस्तांनी मंगळवारी काम बंद पाढले, याबाबत तातडीने दखल न घेतल्यास पाण्यात उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
धरणग्रस्त कृतीसमीतीचे अध्यक्ष अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा दिवसापूर्वीच या आंदोलनाचा इशारा दिला होता. सकाळी आकराच्या सुमारास विविध गांवातून धरणग्रस्थ घोषणा देत धरणस्थऴावर जमा झाले व माती वाहणारे डंपर आडवले व त्याच्यासमोर ठीया मांडला. धरणग्रस्तांच्या प्रलंबीत मागण्या होत नाहीत तोपर्यंत काम चालु करूण देणार नाही आसे सांगून काम बंद केले.
यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, एस. टी. सुरवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, आदींसह पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी धरणग्रस्तांकडून पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात रोख रकमेचा निर्णय झाला असताना इतीवृत्तांतात बदल करणार्यांवर कारवाई करावी, जमीणीच्या बदल्यात रोक रक्कम मागणार्या धरणग्रस्तांची मागणी मान्य करावी, शासनाच्या 2007 च्या निर्णयाप्रमाने ज़मीन वाटप करावे. मराठवाडी व जाधववाडी च्या खासबाब प्रस्थावावर अंतिम निर्णय घेण्यात यावा, जिंती, निगडे, व उमरकांचनच्या धरणग्रस्थांना कराड तालुक्यात गावठाण उपलब्ध करून घ्यावे. 65 टक्के रकमेवरील व्याज मिळावे, बुडीत गेलेल्या जमीनींचे मुल्यांकन करावे, यासह घरबांधनी अनुदान , वाहतूक भत्ता, प्रकल्पग्रस्त गांवठाणासाठी स्वतंत्र ग्रामपंचायती मिळाव्यात आदी मागन्यांचा समावेश या निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान बुधवारी सकाळी पून्हा पोलीस बंदोबस्तात धरणाचे काम सुरू करण्यात आले होते परंतू दुपार नंतर पून्हा वांग मराठवाडी कृती समीतीने अध्यक्ष अनिल शिंदे यांच्या अध्यक्षते ख़ाली धरणग्रस्थांनी काम बंद पाडले.
वांग मराठवाडी धरणाचे काम सुरळीतपणे सुरू असून धरणस्थळावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उत्तमराव भजनावळे सपोनी. ढेबेवाडी पोलीस स्टेशन
धरणग्रस्तांकडून प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन
RELATED ARTICLES