फलटण : विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून विडणी पाझर तलावात धोम बलकवडीचे पाणी सोडल्याने ग्रामस्थ व शेतकर्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
विडणी ता.फलटण येथे 1972 साली दुष्काळात पाझर तलाव्यास मंजूरी मिळाली असताना अनेक वर्ष झाले तरी पाझर तलाव्यास निधी मिळत नव्हता विडणी ग्रामपंचायत माध्यमातून डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी श्रीमंत रामराजे यांचे कडे पाठपुरावा करुन पाझर तलाव्यासाठी 1कोटी निधी उपलब्ध करुन सन 1995/96 साली तलाव्याचे काम पूर्ण झाले या तलाव्यात 35 दशलक्ष घनफुट पाणी साठवण होणार असल्याने विडणी ,माझेरी (पूर्नवसन),पिंपरद ,सोनवडी ,वडले आदी गावांना याचा फायदा झाला.
परंतु गेली 4/5 वर्षात या भागात पाऊसाचे कमी पर्जन्यमान झाल्याने पाझर तलाव कोरडा पडला होता यामुळे या भागातील शेतातील पिके पाण्या अभावी करपून गेली होती विहीर बोअरचे पाणी पुर्णपणे आटले होते पाण्या अभावी लोक बैचेन झाले होते.
धोम बलकवडीचे पाणी दुधेबावी भाडळी गावा पर्यंत आल्याने विडणी माझेरी(पुर्नवसन)सोनवडी आदी गावाने धोम बलकवडीचे पाणी विडणी पाझर तलावात सोडावे यासाठी ग्रामसभेचा ठराव संबंधित विभागाकडे देण्यात आला.याचा पाठपुरावा श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी श्रीमंत संजीव राजे व श्रीमंत रामराजे यांचे कडे करुन गेली 4/5वर्ष विडणी पाझर तलाव्यात पाणी नसल्याने लोकांची शेती धोक्यात आल्याचे निर्देशनास आणून दिले. याची श्रीमंत रामराजे यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकार्यांना धोम बलकवडीचे पाणी भाडळी तलावातून विडणी पाझर तलावात सोडण्याच्या सूचना केल्या.त्यानंतर राञी 11/12वा.दरम्यान विडणी पाझर तलाव्यात पाण्याने प्रवेश केला.आज सकाळी परिसरातील ग्रामस्थांनी पाझर तलावाच्या दिशेने धाव घेतली असता तलाव्यात आलेले पाणी पाहून लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही लोकांनी फटाके वाजवून आनंदाने पाण्यात नाचून आपल्या परीन ऐन उन्हाळ्यात ओढवणारे दुष्काळाचे संकट दूर झाल्याने सर्वजण कृतघ्न झाले होते. पाझर तलावात पाणी आल्याने श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे संचालक जगन्नाथ बुवा नाळे जेष्ठ नेते माधवराव अभंग अशोक काका पवार माझेरी(पुर्नवसन) माजी सरपंच ज्ञानेश्वर दिघे.किसन दिघे.अशोक अभंग प्रसाद बडवे.संजय कोकरे आदीनी सकाळी धोम बलकवडीचे आलेल्या पाण्यात उतरुन आनंद व्यक्त केला.
विडणी पाझर तलावात धोम बलकवडीचे पाणी ; ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश
RELATED ARTICLES