पाटण, दि. 20 : निवृत्त कर्मचारी (1995) समन्वय समिती नागपूर (संलग्न भारत पेन्शनर समाज नवीदिल्ली) यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील वृत्तपत्र व्यावसायिक, एस. टी. महामंडळ, एम. एस. ई. बी., साखर कारखाने, एम. आय. डी. सी, फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया, जिल्हा बॅंका, सूतगिरण्या व मुंबई, पुणे आणि गुजरातमधील अहमदाबाद येथील बंद पडलेल्या कापड गिरण्या, कंपन्या आदी विविध क्षेत्रातील 1995 च्या अत्यंत अल्पशी पेंशन घेणाऱ्या गरीब आणि वयोवृद्ध पेन्शनर्सच्या आणि कार्यरत कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय जाहीर मेळावा सोमवार दि. 24 रोजी सकाळी 11 वाजता म्हावशी (पाटण) येथील सुस्वाद मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित केला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष वसंतराव टोळे यांनी दिली.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमरावजी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यास राष्ट्रीय उपाध्यक्ष पुंडलीक पांडे, विद्युत क्षेत्र, तांत्रिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे केंद्रीय सरचिटणीस आर. टी. देवकांत, सातारा समन्वय समिती सदस्य भुजंगराव जाधव, पुणे जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन चांदगुडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत ठोकळे, अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष आर. बी. रोहोकले हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑक्टोबर 2016 रोजी दिलेल्या न्याय निर्णयाचा विचार करुन सर्वच क्षेत्रातील पेन्शनर्सना वाढीव पेंशन मिळालीच पाहिजे. त्याकरता सर्व पेंशनरनी अर्ज भरणे गरजेचे आहे. तसेच पेन्शनरच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा पत्नीला शंभर टक्के पेंशन मिळालीच पाहिजे. पेंशन देताना एक्समटेड आणि अनएक्समटेड असा फरक करू नये. त्यासाठी हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात दावे दाखल केले आहेत. त्याचा निकालही लवकर लागेल. तसेच ज्या पेन्शनर्सना दोन वर्षांचे वेटेज पेंशन मिळाले नाही तसेच ज्या पेन्शनर्सना अजूनही कमीत कमी एक हजार रुपयांची पेंशन मिळण्याचीच अडचण कायम आहे त्यांना कमीत कमी एक हजार रुपये पेंशन ही त्वरीत मिळालीच पाहिजे यासाठी मोठे आंदोलन मुंबई येथे बुधवार दि. 24 ऑक्टोबर 2018 रोजी आझाद मैदानावर करण्यात येणार आहे. त्या आंदोलनाचीही पूर्वतयारी पाटण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय पेन्शनर्सच्या मेळाव्यात करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील पेंशनर बंधू व भगिनी आणि कार्यरत कर्मचारी यांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वसंतराव टोळे (मो. नं। 9011272725) यांनी केले आहे.
ईपीएस पेन्शनर व कर्मचाऱ्यांचा म्हावशीत सोमवारी जिल्हास्तरीय मेळावा
RELATED ARTICLES