सातारा (जि.मा.का): जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2023-24 या वर्षातील तालुका,जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धत सहभागी होणाऱ्या खेळाडू,क्रीडा शिक्षक यांना तालुका व जिल्हा क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, स्पर्धचे स्थळ, खेळाडू नोंदणी, प्रवेश शुल्क भरणे, स्पर्धाच्या पत्रिका इ. बाबतची माहिती देण्यासाठी http://dsosatara.co.in/school/index.php वेबासाईट तयार करण्यात आलेली आहे, स्पर्धेत सहभागासाठी ऑन-लाईन प्रवेश नोंदणी सुरू असून प्रवेश शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 अशी आहे.
यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात येत असून बैठकांमध्ये स्पर्धा आयोजनाची नियमावली, तालुका व जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबतची स्थळे व आयोजनास इच्छुक संस्था, शाळा, तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्राथमिक प्रवेशिक ऑन- लाईन कार्यवाही, स्पर्धा आयोजन खर्चाबाबत माहिती, चर्चा व अडचणी ,अल्पसंख्यांक खेळाडूंचा सहभाग वाढविणेबाबत उपाययोजना यावर चर्चा करण्यात येणार आहे.
या वर्षाच्या शालेय व इतर क्रीडा स्पर्धातून खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व वातावरण मिळवून देण्याचा व त्यांची कारकीर्द पुढे उज्जवल करण्यासाठी आपण मिळून चांगले प्रयत्न करुन सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल होईल, अशी कामगिरी करावी. असे आवाहन करण्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, क्रिडा विभाग यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
000000
जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन ; प्रवेश शुल्क भरण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट
RELATED ARTICLES