पाटण:- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती पाटण शहर व परिसरात उत्साहपुर्ण व कोरोना नियमांचे पालन करुन साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जयंती निमित्त पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचारी स्टाफ, व रुग्णांना हिम्मत देवकांत व त्यांच्या मित्रपरिवाराने मास्कचे वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.
गेल्या वर्षापासून जगावर कोरोनाचा विळखा वाढत आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने रुद्र रूप धारण केले आहे. अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे. आरोग्य यंत्रणाच या कोरोनाने हायरिस्क मध्ये आली आहे. या यंत्रणेत आपल्याच माता-भगणी बांधव अहो – रात्र काम करत आहेत. यांची सुरक्षा म्हणजेच आपली सर्वांची सुरक्षा राहणार आहे. असे मानून पाटण येथील हिम्मत देवकांत व त्यांच्या मित्रपरिवाराने ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, सर्व स्टाफ तसेच रुग्णांना मास्कचे वाटप केले. यावेळी हिम्मत देवकांत यांचे मित्र अमोल कांबळे, आदित्य भोळे, रोहित खुडे, नितीन पवार, महेश सातपुते, उमेव चव्हाण, राहुल सुतार हे उपस्थित होते.
फोटो- मास्कचे वाटप करताना हिम्मत देवकांत, सचिन कुंभार, पंकज सोनावले आदी.